मालिका, चित्रपटांच्या शुटिंगसाठी नव्या SOPची घोषणा

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून घोषणा केली. 

Updated: Aug 23, 2020, 03:43 PM IST
मालिका, चित्रपटांच्या शुटिंगसाठी नव्या SOPची घोषणा title=

मुंबई : माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी मालिका आणि चित्रपट निर्मितीसाठी नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची घोषणा केली. शुटिंगमध्ये सामील असलेल्यांसाठी सुरक्षित वातावरण ठेवण्यास नवीन एसओपी लाभदायक ठरेल असं ते म्हणाले आहेत. दरम्यान देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तब्बल ६ महिने चित्रपट आणि मालिकांची शुटिंग देखील बंद करण्यात आली. 

त्यानंतर आता कलाकार आणि सेटवरील इतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रकाश जावडेकर यांनी नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची घोषणा केली. 'मालिका आणि चित्रपट निर्मितीसाठी नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरची घोषणा केल्यामुळे मी आनंदी आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शुटिंग जवळपास ६ महिन्यांपासून बंद असल्याचं देखील त्यांनी सांगितले. 

जावडेकरांनी प्रसिद्ध केलेल्या नव्या स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरमध्ये कलाविश्वातील लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. शिवाय मास्क देखील बंधनकारक असणार आहे. शुटिंग क्षेत्र योग्य रितीने सॅनिटाइझ करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.