प्रिया प्रकाशचा व्हीडिओ पाहिल्यानंतर काय होती तिच्या आई-बाबांची  प्रतिक्रिया?

 हे युग सोशल मीडियाचं आहे....

Updated: Jun 1, 2022, 08:37 PM IST
प्रिया प्रकाशचा व्हीडिओ पाहिल्यानंतर काय होती तिच्या आई-बाबांची  प्रतिक्रिया? title=

मुंबई : हे युग सोशल मीडियाचं आहे. व्हिडिओ व्हायरल व्हायला एक मिनीट लागतं. या युगात तुम्ही रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनू शकता. आता तुम्ही प्रिया प्रकाश वारियरकडेच बघा. तिच्या नुसत्या डोळ्यांच्या एक्सप्रेशनने करोडोंच्या लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. तिच्या चित्रपटातील एका गाण्याच्या छोट्या "विंक व्हिडीओने" तिला रातोरात स्टार बनवलं.  याचा तिला जरा पण अंदाज नव्हता. लोकप्रियतेमुळे साऊथच्या अभिनेत्रीला वर्षभरानंतर बॉलीवूड चित्रपटाची ऑफर मिळीली.

सध्या प्रियाकडे श्रीदेवी बंग्‍लो आणि लव हॅकर्स. हे दोन बॉलिवूड चित्रपट आहेत. आता तिने ''श्रीदेवी बंगलो''चे शूटिंग पूर्ण केलं असून 'लव्ह हॅकर्स'च्या शूटिंगसाठी ती लखनऊमध्ये आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियाने सांगितलं की, तिचं गाणे का व्हायरल झालं हे तिच्या पालकांना अजिबात माहित नव्हतं.

एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रिया म्हणाली, मला माझ्या आई-वडिलांची प्रतिक्रिया आठवते. माझ्या आई-वडिलांनी दोघांनाही प्रश्न विचारला होता की, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काय आहे? त्या व्हिडिओमध्ये काय होतं याबद्दल माझे पालक अजूनही अनभिज्ञ आहेत.

प्रियाचे वडील प्रकाश वारियर यांनीही गाणं रिलीजच्या दिवशी काय घडलं याबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, प्रियाचा विंकिंग व्हिडिओ पाहिला. तेव्हा आम्हाला तो व्हिडिओ आवडला. पण तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला हे कळालं नाही की, प्रियाने एका डोळा मारल्याने संपूर्ण देश तिच्यावर का फिदा झालं हे समजलं नाही. 22 वर्षीय प्रियाचा जन्म केरळमधील त्रिशूर येथे झाला. 2021 मध्ये ती दोन तेलुगु चित्रपटांमध्ये दिसली आहे.