मुंबई : काही वर्षांपूर्वी अभिनेत्री प्रियांका चोप्राने निक जोनाससोबत लग्न केलं. हॉलिवूड सिंगर निक जोनास हा इंडियाचा जावई आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे Lollapalooza performance. जेव्हा निकचा हा परफॉर्मन्स पाहून सगळं पब्लिक त्याला प्रोत्साहित करु लागली आणि त्याला भावोजीम्हणून चिअर करु लागली. एवढंच नव्हेतर निकचा भाऊ केविन आणि जो जोनास देखील त्याला जिजू-जिजू चिडवताना दिसले. सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये निक जोनास एक गंमतशीर गोष्ट करताना दिसत आहे आणि म्हणताना दिसतोय की प्रियांका आणि भारतीय लग्न समारंभाना कंटाळला आहे.
२०१८ मध्ये निक आणि प्रियंकाचं लग्न झालं
आम्ही तुम्हाला सांगतो की, निक जोनासने 2018 मध्ये प्रियांकासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांनी हळद, मेहंदी, संगीत या सगळ्या रितीरिवाजानुसार भारतीय परंपरेनुसार लग्न केलं ज्यानंतर निकचा आणि प्रियांकाचा पारंपारिक ख्रिश्चन विवाह झाला. यानंतर 2022 मध्ये हे कपल पालक झाले. प्रियांका सरोगसीद्वारे आई झाली.
निकने प्रियांकासोबत भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केलं
जोनास बंधू निक, कैविन आणि जो द लेट लेट शो विद जेम्स कॉर्डनमध्ये एक कारपूल सत्र आणि लाई डिटेक्टर टेस्टचा हिस्सा होते. ज्यात त्यांना खूप गंमतिशीर प्रश्न विचारले ज्यामध्ये त्यांना केवळ हो की नाही अशी उत्तर द्यायची होती. जेम्नने निकला विचारलं की, तुमच्या लग्नाचे कोणते विधी कधी पार पडले? यावर निकने गंमतिशीर पद्धतीने उत्तर दिलं आणि म्हटलं की, जेव्हा त्याने त्याच्या लग्नाची बिलं पाहिली तेव्हा मला विशेषतः भारतीय समारंभाबद्दललचा खर्च पाहून धक्का बसला. आणि वाईट वाटलं.
निक प्रियांकाच्या लग्नाचे कार्यक्रम पाहून हैराण झाला होता अभिनेत्रीचा दीर
केविन जोनासने शेअर केलं की, निक जोनास आणि प्रियांकाचं लग्नादरम्यान त्यांच्या विधींमध्ये खूप व्यस्त होते आणि विचार करत होते की, हे सगळं कधी संपणार. याचबरोबर पुढे जो जोनासला विचारलं गेलं की, त्याला त्याचा कोणत्या भावाची पत्नी त्रास देते. यावंर त्याने नाही असं उत्तर दिलं. मात्र खोट पकडलं जाणारी मशिनने अन्यथा सांगितलं. यानंतर जो ने याबद्दल जास्त काही न बोलता. मात्र त्याचे भावाला त्याच्यावर हसू आवरता येत नव्हतं आणि त्याला यावर चिडवतानाही दिसले.