'ब्रेस्ट इम्प्लांट करण्यासाठी बोटॉक्स घेण्याचा सल्ला...' राधिका आपटेचं धक्कदायक वक्तव्य

बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे हिला आज कोणत्याही विशेष ओळखीची  गरज नाही.

Updated: Nov 14, 2022, 06:58 PM IST
'ब्रेस्ट इम्प्लांट करण्यासाठी बोटॉक्स घेण्याचा सल्ला...' राधिका आपटेचं धक्कदायक वक्तव्य title=

मुंबई : चौकटीबाहेरच्या भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देत त्या भूमिका तितक्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अभिनेत्रींची संख्या हिंदी कलाविश्वात दिवसागणिक वाढत आहे. अमुक एका धाटणीचेच चित्रपट साकारण्यापेक्षा अभिनय कौशल्य आणखी खुलवण्याचाच प्रत्येक अभिनेत्रीचा अट्टहास असतो.

अशीच आपलं वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. बोल्ड आणि बिनधास्त भूमिका ही राधिकाची ओळख. त्याला जोड मिळते ती म्हणजे तिच्या अभिनयाची. सध्याच्या घडीला यशस्वी अभिनेत्रींमध्ये राधिकाही गणली जाते. पण, यशाच्या तिच्या संकल्पना मात्र फारच वेगळ्या आहेत. यशाच्या वाटेवर चालत असतानाही आपण, यशस्वी नाही असंच तिचं म्हणणं आहे. 

बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटे हिला आज कोणत्याही विशेष ओळखीची  गरज नाही. स्क्रीनपासून ओटीटीपर्यंत तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुशिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अर्थशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केला आहे. तिने,  'वाह', 'लाइफ हो तो ऐसी' या सिनेमातील छोट्या भूमिकेतून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने बदलापूर, हंटर, पॅडमॅनसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.

पार्च्ड चित्रपटातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटात तिने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. राधिका आपटेने 'पार्च्ड' चित्रपटात टॉपलेस होऊन खळबळ माजवली होती. आपल्या कामाच्या जोरावर चांगली प्रसिद्धी आणि ओळख निर्माण करणाऱ्या राधिकाच्या अडचणी अजूनही कमी झालेल्या नाहीत.

राधिका आपटे लवकरच 'फॉरेंसिक' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्या विरुद्ध विक्रांत मैसी दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत राधिकाने सांगितलं की, अभिनेत्रींना अजूनही 'खास बॉडी शेप आणि साइज' नसल्यामुळे नाकारलं जातं. तिला ब्रेस्ट इम्प्लांट करण्यासाठी बोटॉक्स घेण्याचाही सल्ला देण्यात आला. राधिकाने उघड केलं की, काही प्रोजेक्ट्स तिच्या हातातून निघून गेले कारण इतर अभिनेत्रींचं स्तन आणि ओठ तिच्या तुलनेत मोठे होते.

कास्टिंग काउचचा सामना केला आहे
सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे आणि राधिकाही यातून सुटू शकली नाही. काम देण्याच्या बहाण्याने राधिकाकडे सेक्‍सुअल फेवरची मागणीही करण्यात आली. राधिकाने स्वतः सांगितलं होतं की, एकदा साऊथच्या एका अभिनेत्याने मला माझ्या खोलीत बोलावून फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या फटकारण्यावर आम्ही दोघे खूप भांडलो. एकदा एका निर्मात्याचा तिला फोन आला आणि तुम्ही चित्रपटाच्या अभिनेत्याला भेटा असं सांगितलं. तू त्याच्याबरोबर फिजीकल रिलेशन ठेवशील का? अशीही विचारणा तेव्हा अभिनेत्रीला केली असं तिचं म्हणणं आहे