Rahul Mahajan Divorced: कायम चर्चेत असलेल्या राहुल महानज (Rahul Mahajan) आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राहुलचे तिसऱ्यांदा लग्न मोडले असून तो पत्नी नताल्या इलीनासोबत (natalya) घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लग्नाच्या चार वर्षानंतर राहुल आणि नताल्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि त्याच्या पत्नीने मागच्याच वर्षी घटस्फोटासाठी अर्ज सादर केला होता. राहुल महाजन याचे हे तिसरे लग्न असून या पूर्वी डिंपी गांगुलीसोबत त्याचे लग्न चर्चेत आले होते. (Rahul Mahajan Marriage)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि नताल्या यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद होत होते. मात्र, त्यांनी अनेक वर्ष लग्न टिकवण्याचे प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. गेल्या वर्षी दोघांनीही वेगळे राहण्यास सुरुवात केली आणि घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. मात्र घटस्फोट झालाय की अजूनही प्रोसिडिंग सुरु आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाहीये, असं राहुलच्या जवळच्या मित्रांनी म्हटलं आहे. नताल्या राहुलची तिसरी पत्नी आहे.
राहुलने 2006मध्ये श्वेता सिंह सोबत लग्न केले होते. मात्र, त्यांचा संसारही फार काळ टिकला नाही. 2008मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर 'राहुल दुल्हनिया ले जाएगा' या या रिअॅलिटी शोमध्ये त्याची ओळख डिंपी गांगुलीसोबत झाली होती. दोघांनी 2010मध्ये लग्न केले होते. पण 2015मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
राहुलच्या जवळच्या मित्रांने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या घटस्फोटानंतर राहुल पूर्णपणे खचला होता. त्याची तब्येतही बिघडली आहे. आता तो त्या दुखःतून सावरत आहे. तर पुन्हा पहिलेसारखं सगळं चांगले करण्याचा तो प्रयत्न करत आहे. मागच्या वर्षी त्याची अवस्था पाहवत नव्हती, असं त्याच्या मित्रांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, त्याला पुन्हा प्रेम मिळेल अशी त्याला आशा आहे. या कटु अनुभवातून त्याने निर्णय घेतला आहे. तो आता त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणार नाही, असंही तो म्हणाला आहे.
घटस्फोटाच्या चर्चांवर राहुल महाजनची एका वृत्तसंस्थेने प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या चर्चांचे ना त्याने खंडन केले ना दुजोरा दिला. राहुल महाजन याने सविस्तर बोलणे टाळले आहे. मला माझ्या आयुष्यातील घटना खासगी ठेवायच्या आहेत. मला आता कशावरच बोलायचे नाहीये, मी यावर माझ्या मित्रांसोबतही बोललो नाहीये, असं राहुल महाजन याने म्हटलं आहे. नताल्यानेदेखील घटस्फोटाच्या चर्चांवर बोलणे टाळले आहे.