या प्रसिद्ध अभिनेत्रींना Adult Industry मध्ये आणण्यासाठी राज कुंद्राचा हात

कोण आहेत या प्रसिद्ध अभिनेत्री?

Updated: Jul 20, 2021, 09:15 AM IST
या प्रसिद्ध अभिनेत्रींना Adult Industry मध्ये आणण्यासाठी राज कुंद्राचा हात  title=

मुंबई :  अश्लिल चित्रपट चित्रीत करण्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती  आणि उद्योजक राज कुंद्राला अटक केली आहे. सोमवारी जवळपास 7 ते 8 तास चौकशी केल्यानंतर संध्याकाळी कुंद्राला अटक करण्यात आली.  दरम्यान अभिनेत्री शेर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी पोलिसांना दिलेलं जबाब सध्या तुफान चर्चेत येत आहे. शेर्लिन आणि पूनम यांच्या जबाबनंतर  राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

अभिनेत्री शेर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी महाराष्ट्र सायबर सेलला दिलेल्या जबाबात त्यांना Adult Industryमध्ये आणणारा दुसरा तिसरा कोणी नाही, तर  राज कुंद्रा होता. राजने शेर्लिन चोप्राला प्रत्येक प्रोजेक्टसाठी 30 लाख रूपये दिले असल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे शेर्लिनने राज कुंद्रासोबत असे जवळपास 20 प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सर्वप्रथम सॉफ्ट पोर्नोग्राफी प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने राज कुंद्राचा जबाब नोंदवला होता.  शिवाय सेलने सॉफ्ट पोर्नोग्राफी प्रकरणी 26 मार्च रोजी एकता कपूरचा देखील जबाब नोंदवला होता. 

दरम्यान, राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. आता या प्रकरणी अजून किती रहस्य समोर येतील हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे.