Rajinikanth Health Update : किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत, डॉक्टरांनी सांगितलं, नेमकं काय झालं?

अभिनेता रजनीकांत यांना सकाळी अचानक झालेल्या पोटदुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रजनीकांत यांच्या तब्बेतीबाबत डॉक्टरांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 1, 2024, 02:03 PM IST
Rajinikanth Health Update : किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत, डॉक्टरांनी सांगितलं, नेमकं काय झालं?  title=

सुपरस्टार रजनीकांत यांना सोमवारी मध्यरात्री पोट दुखीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चेन्नईतील रुग्णालयात दाखल केल्यानंतर आता त्यांचे हेल्थ अपडेट आले आहेत. डॉक्टरांनी स्वतः रजनीकांत यांच्या आताच्या परिस्थितीची माहिती समोर आली आहे. 

 रजनीकांत यांच्यावर चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात यशस्वीरित्या निवडक प्रक्रिया पार पाडली आहे. या दरम्यान त्यांच्या पोटाच्या खालच्या भागाजवळ स्टेंट टाकण्यात आला. कॅथ लॅबमध्ये तीन विशेष डॉक्टरांच्या पथकाने ही प्रक्रिया पार पाडली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. डिस्चार्ज देण्यापूर्वी पुढील 2-3 दिवस ते रूग्णालयात बरे होतील.

(हे पण वाचा - सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, रात्री अचानक... पत्नीने दिले हेल्थ अपडेट) 

रजनीकांत यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंता वाढली आहे. परंतु त्यांची पत्नी लता रजनीकांत यांनी रजनीकांत यांची तब्बेत बरी असल्याच सांगितलं. पोटदुखीचा त्रास जाणवत लागल्याने सोमवारी रात्री अभिनेत्याला चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटदुखीच्या शस्त्रक्रियेमुळे रजनीकांत यांना आणखी आणखी 2 ते 3 दिवस रुग्णालयातच ठेवणार असल्याच डॉक्टरांनी सांगितलं. 

रजनीकांत यांच्या पोटावर शस्त्रक्रिया

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, 73 वर्षीय रजनीकांत यांच्यावर मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया झाली. एएनआयच्या वृत्तानुसार, सोमवारी 30 सप्टेंबर रोजी त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या पोटात प्रचंड दुखत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीने त्यांच्या चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे आणि ते सोशल मीडियावर त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी शुभेच्छा आणि प्रार्थना करत आहेत