RAJU SRIVASTVAA GOT THREATENING CALL FROM DAUD IBRAHIM :कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हार्ट अटॅक आल्यामुळे हॉस्पिटल मध्ये जीवन मृत्यूशी झुंज देतोय..चाहते त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत . राजू श्रीवास्तवच्या आजारपणाच्या प्रकृतीसंदर्भातल्या अनेक बातम्या अफवा समोर येताहेत आणि चाहत्यांची चिंता आणखी वाढत आहे.
राजू श्रीवास्तवचे इंडस्ट्रीमधील मित्रसुद्धा त्याच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्याविषयी अनेक किस्से,बातम्या पाहायला ऐकायला मिळत आहेत.
असाच एक किस्सा राजू श्रीवास्तव सोबत घडला होता ज्याची खूप चर्चा झाली होती.
2010 मध्ये राजू श्रीवास्तव ला दौड कडून धमकी मिळाली होती .त्याच झालं असं कि 2010 मध्ये एका शो दरम्यान राजू श्रीवास्तव ने दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) वर एक जोक केला होता त्यांनतर त्याला हि धमकी आली होती,त्याने अनेक जोक्स केले होते ज्यात दाऊद वरील जोक्स ची क्लिप वायरल झाल्यानंतर पाकिस्तानहून त्याला धमकीचे फोन आले होते इतकंच नाही तर त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा याच दरम्यान आली होती प्रकरणांनंतर राजू श्रीवास्तव घाबरला न्हवता पण जेव्हा त्याच्या सेक्रेटरीला धमकवण्यात आलं तेव्हा मात्र पोलिसांना कळवून सिक्युरिटी घेण्यात आली '