Rakhi Sawant वर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर, आईच्या निधनानंतर आदिलनंही सोडलं? Video समोर

Rakhi Sawant चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आदिलनं तिला सोडलं का? असा प्रश्न अनेकांना आला आहे. 

Updated: Feb 2, 2023, 08:48 PM IST
Rakhi Sawant वर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर, आईच्या निधनानंतर आदिलनंही सोडलं? Video समोर  title=

Rakhi Sawant Talk About Her Marriage : बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंतची आई (Rakhi Sawant Mother) जया सावंत (Jaya Sawant) यांचं शनिवारी 29 जानेवारी निधन झालं. राखीची आई जया यांच्यावर मुंबईमधील रुग्णालयात ब्रेन ट्युमरवरील (Brain Tumour) उपचार सुरु होते. मुंबईतील क्रीकेअर रुग्णालयामध्ये जया सावंत यांनी अखेरचा श्वास  घेतला (Jaya Sawant Passed Away). मागील काही दिवसांपासून राखी सातत्याने तिच्या आईच्या तब्बेतीसंदर्भातील अपडेट्स शेअर करत होती. राखीने रुग्णालयामधील व्हिडीओ शेअर करत आईवर उपचार सुरु असल्याचं तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं. मात्र, काल राखीच्या आईचं उपचादारादरम्यान निधन झालं. दरम्यान, आता राखीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल समोर आला आहे. या व्हिडीओतून तिचं लग्न धोक्यात आल्याचे राखीनं सांगितलं आहे. सोशल मीडियावर राखी एकामागे एक व्हिडीओ शेअर करत आहे. तिचे हे व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या आयुष्यात प्रेम राहिलं नाही असं ती बोलत आहे. 

राखी सावंतचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफरच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत राखी रडताना दिसत आहे. या व्हिडीओत राखी बोलते की तिचं लग्न धोक्यात असून हा विनोद नाही. तिला तिचे लग्न वाचवायचे आहे. राखी सोशल मीडियावर एकामागून एक पोस्ट शेअर करत आहे, ज्यामध्ये राखी तिच्या अधुऱ्या प्रेमाविषयी सांगताना दिसते. राखी बोलते की लग्न काही जोक नाही. माझ्या आईला जाऊन दोन दिवस झालेत. मला माझं लग्न वाचवायचं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राखीनं खुलासा केला होता की आदिल खानच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला आणि त्यांचे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, राखीचं हे पहिलं लग्न नाही. या आधी राखीचं रितेश नावाच्या व्यक्तीशी पहिले लग्न झाले होते. रितेश विषयी राखीनं खुलासा केला होता. रितेश नावाच्या तिच्या पतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होती. अनेकांनी तिचं हे लग्न खोटं असल्याचं म्हटलं होत. मात्र, रितेशचा चेहरा हा बिग बॉस या शोमध्ये तिनं दाखवला. शो संपल्यानंतर रितेश आणि राखीचं नातं देखील तुटलं. त्याच्या काही दिवसानंतर राखीचं नाव आदिल खानशी जोडण्यात आलं.

हेही वाचा : Aishwarya Rai सोबत रेडकार्पेटवर गेल्यामुळे Abhishek Bachchan ला ऐकावे लागले होते टोमणे, ट्रोलर्सला असं दिलं प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राखीनं खुलासा केला होता की तिचं आणि आदिलचा विवाह झाला आहे. त्यांचे लग्न सात महिन्यांपूर्वी झाले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आदिलनं राखीशी लग्न केल्याच्या बातमीवर नकार दिल्याचे देखील तिनं सांगितलं होतं. काही काळानंतर आदिलनं त्यांच्या विवाहाला होकार दिला होता