‘अॅनिमल’ गाजला; रणबीरचा भाव वाढला
Ranbir Kapoor : रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता या चित्रपट बॉक्सऑफिसवर 900 कोटींचा गल्ला जमवत अनेक विक्रम मोडीत काढले. या चि्त्रपटाच्या यशानंतर रणबीर कपूरच्या अभिनयाचं केवळ त्यांच्या चाहत्यांकडूनच नाही तर समिक्षकांकडूनही कौतुक होताना दिसत आहे. रणबीरचा वेगळा लूक, आणि डॅशिंग अंदाज या चित्रपटामध्ये दिसून आला. या चित्रपटातून मिळालेल्या संधीचं रणबीरनं सोनं केलं. या चित्रपटाच्या माध्यमातून रणबीरच्या करिअरला पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे अशीही चर्चा मनोरंजन क्षेत्रात आहे. असं असतानाच रणबीरनेही या प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होत संधी एन्कॅश करण्याचा निर्णय घेतला आहे.
मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क
‘अॅनिमल’नंतर सध्या रणबीर कपूरच्या मानधनाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. बॉलिवूडमध्ये कलाकारांच मानधन हे कोट्यवधींच्या घरात असतं. कलाकाराला प्रसिद्धी मिळाल्यावर त्याच्या मानधनावरही सकारात्मक परिणाम होतो आणि त्याची चित्रपटांच्या बाजारातील किंमत वाढते. अभिनेता रणबीर कपूरला ‘अॅनिमल’नंतर पुन्हा एकदा 'अच्छे दिन' आल्याचं दिसत आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटासाठी रणबीरने 70 करोड रुपये मानधन घेतले होते. एका रिपोर्टनुसार रणबीर कपूरने ‘अॅनिमल’च्या यसानंतर फी वाढवली आहे. रणबीर आता दीडपट फी आकारतो. एका चित्रपटासाठीच्या फीमध्ये रणबीरने 30 कोटींनी वाढ केली आहे. म्हणजेच आता रणबीर एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटींचं मानधन घेत असल्याचं बोललं जात आहे. मात्र याला रणबीरने कुठेही अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.
'संजू'च्या चौपट फी
संजू चित्रपटाच्या यशानंतर रणबीर कपूरने वाढवली फी
‘संजू’ चित्रपटाच्या यशानंतरही रणबीरने त्याची फी वाढवल्याची बातमी समोर आली होती. रणबीर कपूरने संजू 'या' चित्रपटानंतर एका जाहीरातीसाठी 8 कोटी ते 12 कोटी इतके रुपये घेतले होते. तर या चित्रपटासाठी त्याने 25 कोटी रुपये घेतले होते. म्हणजे सध्याची रणबीरची फी ही 'संजू'च्या फीपेक्षा चौपट आहे.
आलिया भट्ट घेले इतकी फी
आलीया भट्ट ही स्क्रिप्टनुसार मानधन घेत असल्याचं सांगितलं जातं. आलियाने 'ब्रह्मास्त्र'साठी 10-12 कोटी रुपये मानधन घेतले होते. त्याचप्रमाणे 'गंगूबाई काठियावाडी' या तिच्या गाजलेल्या चित्रपयासाठी तिने 20 कोटी रुपये मानधन घेतले होते.
कार्तिक आर्यन कधीच वाढवत नाही फी
चित्रपट हिट झाल्यावर कलाकार त्यांची फी वाढवतात. सनी देओल ते रणबीर कपूरपर्यंत सगळेच कलाकार मानधन वाढवतात. अभिनेता सनी देओलने 'गदर 2' साठी 8 कोटी रुपये मानधन घेतले होते. पण या सगळ्या कालाकारांमध्ये अभिनेता कार्तिक आर्यन हा अपवाद ठरतो. एका मुलाखतीत कार्तिकने सांगितलं होतं की, 'एखाद्या चित्रपटाच्या अपयशानंतर आपण आपली फी कमी करत नाही, तर अशाच पद्धतीने एखाद्या चित्रपटाच्या यशानंतर ती का वाढवायची?'