मुंबई : रानू मंडल हे नाव एकेकाळी संपूर्ण देशात गाजलं होतं. रानू मंडलच्या गायनाने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती आणि करोडोच्या हृदयात स्थान निर्माण केलं होतं. रानू मंडल पश्चिम बंगालमधील राणाघाट रेल्वे स्थानकावर लता मंगेशकर यांची गाणी म्हणायची. रानू मंडलचा व्हायरल झालेल्या व्हिडिओने तिला रातोरात स्टार बनवलं. यूट्यूबवर रानू मंडलचा एक व्हिडिओ पाच लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. ज्यामध्ये ती बंगाली यूट्यूबरसोबत चिकन बनवताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये रानू मंडल युट्युबरसोबत फक्त जेवण बनवताना दिसत नाही. तर ती तिच्या आयुष्याबद्दलही बोलत आहे. यासोबतच ती गाणं म्हणताना देखील दिसत आहे. रानू मंडलने हिमेश रेशमियाच्या 'तेरी मेरी कहानी' या गाण्यालाही तिचा आवाज दिला आहे.
काही दिवसांपूर्वी रानू मंडलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती 'मणिके मागे हिथे' हे सुपरहिट गाणं गात होती. राणू मंडलच्या या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आणि चाहत्यांची मनं जिंकली होती. रानू मंडलवर बायोपिकही बनवण्यात येणार आहे. 'मिस रानू मारिया' असं या चित्रपटाचं नाव असून हृषिकेश मंडल या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री इशिका डे रानू मंडलची भूमिका साकारणार आहे.