'सुहाना खान-खुशी कपूर पेक्षा...', रवीना टंडनची लेक राशा थडानीवर कौतुकांचा वर्षाव

Rasha Thadani : रवीना टंडनची लेक राशा थडानीचा तिच्या आगामी चित्रपटातील डान्स पाहून नेटकऱ्यांनी केली सुहाना खान आणि खुशी कपूरशी तुलना... 

दिक्षा पाटील | Updated: Jan 5, 2025, 10:20 AM IST
'सुहाना खान-खुशी कपूर पेक्षा...', रवीना टंडनची लेक राशा थडानीवर कौतुकांचा वर्षाव title=
(Photo Credit : Social Media)

Rasha Thadani : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची लेक राशा थडानी ही ‘आजाद’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात राशा थडानीसोबत अमन देवगनसोबत दिसणार आहेत. या चित्रपटातील ‘उई अम्मा’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. गाण्यात राशाचा परफॉर्मेंस आणि त्यासोबत तिनं दिलेल्या एक्सप्रेशनची सगळ्यांनी स्तुती केली आहे. अनेकांनी रवीनाची आठवण आल्याचं म्हटलं, तर काहींनी राशाला टॅलेंटेड स्टारकिड म्हटलं आहे. सुहाना खान आणि खुशी कपूर पेक्षा ती खूप जास्ती चांगली अभिनेत्री आहे. त्यात राशा ही खूप एनर्जेटिक दिसते.  

‘उई अम्मा’ गाण्यात राशा थडानी तिच्या अप्रतिम डान्स मूव्ह सगळ्यांना आवडतात. राशा थडानी ही सुंदर आणि एनर्जीनं भरलेली आहे. त्याशिवाय राशा आणि तिचा को-स्टार अमन देवगनसोबत तिची केमिस्ट्री सगळ्यांच्या पसंतीस उतरत आहे. काही तासांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या गाण्याला 18 लाख पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. हे गाणं अमित त्रिवेदीनं कंपोज केलं आहे आणि मधुबती बागचीनं हे गाणं गायलं आहे. तर हे गाणं अमिताभ भट्टाचार्यनं शब्दबद्ध केलं आहे. तर बोस्कोनं कोरियोग्राफ केलं आहे. गाण्याचं व्हिज्युअल्स अट्रॅक्ट केलं आहे. यूट्यूबवर या गाणं पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी राशाची स्तुती केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : गोविंदासोबत राहत नाही त्याची पत्नी सुनीता! म्हणाली, 'त्याच्याकडे रोमान्स करायला वेळ नाही; पुढच्या जन्मी तो...'

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, तिच्या डेब्यूसाठी हे गाणं खूप परफेक्ट आहे. तिचे चेहऱ्यावरील हावभाव देखील योग्य आहेत. दुसरा नेटकरी म्हणाला, 'बापरे... कसला सुंदर डान्स केला आहे ज्युनियर रवीनानं. राशाचे हावभाव आणि डान्सिंग स्किल्स रवीनाला प्रचंड आवडले आहेत. ती नक्कीच पुढची सुपरस्टार होणार.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'राशा तिच्या आईप्रमाणे परफॉर्म करत आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'खुशी कपूर आणि सुहाना खानपेक्षा सुंदर राशाचे हावभाव आहेत. ती भावी कतरिना कैफ आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'टॅलेन्ट... नेपोटिज्म यावेळी योग्य मिळालं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'कतरिना प्लस रवीना म्हणजेच राशा.' राशा थडानी अभिनय क्षेत्रात येण्या आधीपासून चर्चेत होती. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिच्या पोस्ट या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.