लग्न नाही, तरीही वयाच्या 21 व्या Raveena Tandon झाली दोन मुलींची आई; त्या निर्णयाबद्दल म्हणाली...

Raveena Tandon On adopting daughters : रवीना टंडननं वयाच्या 21 व्या वर्षीच दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. त्यामुळे तिला अनेकांनी अनेक गोष्टींवरून ट्रोल केलं. रवीनानं इतका मोठा निर्णय इतक्या लहाण वयात कसा घेतला याविषयी तिनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: May 31, 2023, 05:23 PM IST
लग्न नाही, तरीही वयाच्या 21 व्या Raveena Tandon झाली दोन मुलींची आई; त्या निर्णयाबद्दल म्हणाली... title=
(Photo Credit : Social Media)

Raveena Tandon On adopting daughters : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना ही 90 च्या दशकातील गाजलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीना त्या काळात तिच्या करिअरच्या पीकवर होती. अशात रवीनानं दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. 1995 साली रवीनानं दोन मुलींना दत्तक घेतले. पण तेव्हा रवीनाचं लग्न झालं नव्हतं. त्यावेळी रवीनाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याविषयी तिनं एका मुलाखतीत सांगितलं आहे. रवीना तेव्हा फक्त 21 वर्षांची होती, त्यामुळे तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. त्यात देखील रवीनानं कोणत्याही खूप लहाण मुलींना नाही तर 11 वर्षांची छाया आणि 8 वर्षांच्या पूजा या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. 

रवीनानं ही मुलाखत झूमला दिली होती. त्यावेळी तिला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला याविषयी सांगताना रवीना म्हणाली, "जेव्हा पण आपण काही करतो, तेव्हा नेहमीच लक्षात येत की एकतर आपण ट्रोल होऊ किंवा कोणी सेक्सिस्ट कमेंट करणार. कोणतंही कारण नसताना छोट्या गोष्टीपासून वाद सुरु करतात. मला एक आर्टिकल अजून आठवण आहे आणि ते म्हणजे रवीनानं या मुलींना इतकी वर्षे लपवून ठेवलं असेल, ज्यांचा जन्म लग्नाआधी जाला आहे. जेव्हा मी 21 वर्षांची होती तेव्हा 11 आणि 8 वर्षांच्या असलेल्या दोन मुलींना दत्तक घेतलं. तर मी त्यांना नक्की जन्म कधी दिला? 11 किंवा 12 वर्षांची असताना? ट्रोलिंगतर आजही होते. आपण काही केलं तर ट्रोलिंगचा सामना मला देखील करावा लागतो. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला हवं असं मला वाटतं." 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पूजा आणि छायाला दत्तक घेण्याच्या निर्णयावर रवीना म्हणाली, "आपल्या शासनानं ठरवलेल्या वयाचा टप्पा मी पार केला तेव्हा मी पाहिलं की माझ्या काकाच्या मुलांना त्या पद्धतीचं जीवन मिळत नाही आहे जसं त्यांना मिळायला हवं. दुर्दैवाने त्यांचे आई-वडील राहिले नव्हते. मला वाटले की मी असं काही कोणत्या एनजीओसाठी करू शकते, पण इथे दोन मुलं आहेत. ज्यांना मी माझ्या डोळ्यासमोर मोठं होताना पाहिलं. मला असं वाटलं की आता वेळ आली आहे की त्यांना एक चांगलं आयुष्य मिळायला हवं. त्यामुळे मी जेव्हा 21 वर्षांची झाली तेव्हा लगेच मी त्यांना दत्तक घेतले आणि त्यांची लीगल गार्डियन झाले."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रवीना पुढे म्हणाली, "काही काकुंनी मला विचारलं की माझ्याशी कोण लग्न करणार आता? माझ्याकडे तर आधीपासून मुलं आहेत. मला नेहमीच वाटायचं की जो कोणी माझ्यावर प्रेम करेल, तो कोणत्याही परिस्थितीत माझ्याशी लग्न करेल. माझ्या मुली, माझे श्वान आणि मांजरी आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या माझ्याकडे आहेत."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : "25 पाहुणे, फक्त मंगळसुत्राची खरेदी अन्...", मराठमोळ्या अभिनेत्रीनं घरातच लावलं लग्न

रवीना पुढे म्हणाली, अनिल थडानी यांच्यासोबत याच अटीवर ती रिलेशनशिपमध्ये आली होती की तिच्या आधीच दोन मुली आहेत. रवीना म्हणाली "मी त्यांना आधीच सांगितलं होतं की माझ्याकडे पूर्ण एक गॅंग आहे." दरम्यान, अनिल थडानी आणि रवीनाला एक मुलगी असून राशा थडानी असे आहे. तिनं नुकतंच तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे.