मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती समोरील अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी रिया चक्रवर्तीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रिया आणि शौविक सह इतर आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ कल्यामुळे २० ऑक्टोबरपर्यंत रियाला तुरूंगात राहवं लागणार आहे.
रियासह शौविक, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, बासित परिहार आणि झैद विलात्राच्या न्यायालयीन कोठडीत देखील वाढ करण्यात आली आहे. रिया आणि शौविकला एसीबीने ड्रग्स प्रकरणामध्ये अटक केली आहे. रिया आणि शौविक पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
रिया सध्या भायखाळा तुरूंगात बंद आहे. तर रिया आणि शौविकने अनेक वेळा न्यायालयात जामिन याचिका दाखल केली होती. मात्र प्रत्येक वेळा कोर्टाने त्यांची जामिन अर्ज फोटाळला आहे. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला ड्रग्जप्रकरणी ८ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.