Rhea Chakraborty: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. सुशांत सिंह राजपूतने 21 जून 2020 रोजी त्याच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची तेव्हा खूप चर्चादेखील झाली होती. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिचे नावदेखील समोर आले होते. या प्रकरणात अनेक बड्या कलाकारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती दोघांनाही तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यानंतर कित्येक दिवसांनंतर तिची सुटका झाली होती. मात्र, या सगळ्या प्रकरणानंतर रियाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. रियाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. लोक सतत तिला टोमणे मारतात. तिला खूप ट्रोल केलं जातं. तिने शेअर केलेल्या फोटो-व्हिडिओच्या कमेंट्समध्ये सुशांतचे नाव लिहितात.
सुशांतच्या मृत्यूनंतर रियाचे आयुष्य कसे बदलले याचा खुलासा तिने केला आहे. ना काम मिळतंय ना इज्जत मग रिया पैसे कसे कमावते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अलीकडेच रियाने तिचे पॉडकास्ट लाँच केलं होतं. जिथे तिने तिच्या आयुष्यातील त्या वाईट दिवसांबद्दल बोलली आहे. सुष्मिता सेनसोबत झालेल्या मुलाखतीत तिने त्या प्रसंगाबाबतच्या दुखः आठवणींना उजाळा दिला आहे. एक टप्पा असा होता त्यावेळी तिला खूप गोष्टी सहन कराव्या लागल्या. प्रत्येकजण तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असायचा. पण तो फक्त दिखावा असायचा.
माझ्यासोबत काय झालं हे कोणालाच माहिती नव्हता. त्या वाईट प्रसंगातून बाहेर पडल्यावर मला वाटलं की माझा पुनर्जन्म झाला आहे. त्यामुळं त्या दिवसांत माझ्यासोबत जे उभे होतो मला आता त्यांच्यासोबतच जगायचं आहे. अनेकांना जाणून घ्यायचंय की मी पैसे कसे कमावते. माझ्याकडे तर कोणाता चित्रपटदेखील नाही तर माझ्याकडे इन्कम कशी येते? रियाने म्हटलं आहे की, ती एक मोटिवेशनल स्पीकर आहे. त्याच्याच माध्यमातून पैसे कमावते.
रियाने पुढे म्हटलं आहे की, तिच्याकडे जिम, एअरपोर्ट आणि अन्य ठिकाणी जाण्याची शक्ती आहे. कारण लोकांना असं वाटतं की ती काळी जादू करते. लोकांनी मला चुडैलचा टॅग दिला आहे. पण त्याचवेळी असेही काही लोक आहेत जे मला साहसी व शक्तीशाली मानतात. त्यामुळं आता मला काहीच फरक पडत नाही की, माझ्यावर कोण फ्रेम करतं आणि तिरस्कार करतात.