मुंबई : व्हॉटसअॅपच्या माध्यमातून सध्या काही नेटीझन्स, स्वत:चं काल्पनिक यमराज होवून, नावाजलेल्या लोकांची काल्पनिक हत्या करीत आहेत.
कारण व्हॉटसअॅपवर आता योगगुरू बाबा रामदेव यांच्या मृत्यूच्या अफवेनंतर, बॉलीवूडचा बादशहा शाहरूखच्याही मृत्यूची अफवा पसरवली जात आहे.
फ्रान्समध्ये एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी एका फ्रेन्च वेबसाईटने दिल्याचं चित्र रंगवलं जात आहे. ही अफवा व्हॉटसअॅपवर नेटच्या वेगाने पसरत आहे.
मात्र अनेक वेळी या अफवा काही सुज्ञ नेटीझन्सकडून थांबवल्या जातात, नेटीझन्सला असा मेसेज आल्यावर तेच उत्तर देतात, असं काही नाही, अफवा पसरवू नकोस, असे चांगले सल्ले दिले जातात.
मात्र अनेकजण हा मेसेज पुढे फॉवर्ड करतात, तेव्हा अशा अफवा पसरण्यास मदत होते, मात्र सर्वात वाईट म्हणजे व्हॉटसअॅप ग्रुप आणि मित्रांमध्ये अशा अफवेचे मेसेज पसरवल्यानंतर त्यांची बौद्धिक दिवाळखोरीही बाहेर येत असते.
तेव्हा असे मेसेज फॉवर्ड करताना खूप विचार करा, आपल्याला खूप काही लवकर माहिती पडतं या नादात आपण अफवा पसरवतोय, हेच आपल्या लक्षात येत नाही.