मुंबई : 'सेक्रेड गेम्स' ही वेब सीरिज काही वर्षांपूर्वीच प्रदर्शित झाली. एकाहून एक सरस कलाकार आणि त्यांच्या दमदार अभिनयाला या सीरिजमध्ये तितक्याच तगड्या कथानकाची जोड मिळाली होती. या सीरिजमधून काही नवे चेहरेही पाहायला मिळाले. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री कुब्रा सैत. (Sacred games kubra sait)
सीरिजमध्ये कुकू म्हणून झळकणाऱ्या कुब्राचा बोल्ड अंदाज सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेला. त्यातही तिनं नवाझुद्दीनसोबत दिलेल्या इंटिमेट सीननं पाहणारेही हैराण झाले.
एका मुलाखतीत कुब्रानं त्या दृश्याच्या चित्रीकरणावेळचा अनुभव सांगितला. आपण या दृश्याच्या चित्रीकरणानंतर जमिनीवर कोसळून रडायला लागल्याचं तिनं स्पष्ट केलं. कुब्राचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. जवळपास 7 वेळा या दृश्याचं चित्रीकरण करण्यात आलं.
अनुराग कश्यपला या दृश्याला सात वेगळ्या पद्धतींनी सादर करायचं असल्यामुळं हे सर्व करावं लागलं होतं. चित्रीकरणाच्या वेळी कुब्रा अतिशय भावूक झाली होती. एक, दोन, तीन ... सातव्या वेळएसही जेव्हा त्यांनी हा सीन केला त्यावेळी ती पुरती तुटली होती.
या एका सीनमुळं कुब्रा मानसिकरित्या खचली होती, जमिनीवर बसून ती ओक्साबोक्शी रडत होती. एक अभिनेत्री म्हणून वाट्याला आलेली प्रसिद्धी वाटते तितकी सोपी नसते हेच तिचा हा अनुभव सांगून गेला.