Japan Discovers Rare Earth Minerals : सोन्याची खाणी सापडल्यामुळे चीन मालामाल झाला आहे. अशातच आता चीनचा आनंद एका क्षणात नाहीशी करणारी घडामोड जागतिक स्तरावर घडली आहे. जपानमध्ये पृथ्वीवरचा अत्यंत दुर्मिळ खजिना सापडला आहे. आजपर्यंत अशी वस्तू कुठेच सापडली नसल्याचा दावा केला जात आहे. जापनमध्ये सापडलेल्या या खजिन्याचे मूल्य 2100000000000 एवढे आहे.
जपानने प्रशांत महासागराच्या खाली पृथ्वीवरचा अत्यंत दुर्मिळ खजिना शोधला आहे. टोकियोपासून सुमारे 1,200 मैल अंतरावर असलेल्या मिनामी-टोरी-शिमा बेटाजवळ जपानला हा खडिना सापडला आहे. या दुर्मिळ खजिन्यामुळे जपानच्या अर्थव्यस्था झटक्यात भररी घेणार आहे. तसेच या शोधामुळे दुर्मिळ खनिजांच्या बाजारपेठेवरील चीनच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसू शकतो.
समुद्रसपाटीपासून 5,700 मीटर खाली गाडलेल्या या विस्तीर्ण जागेवर सापडलेला खजिना म्हणजे कोबाल्ट आणि निकेल या खनिजांचा साठा आहे. इलेक्ट्रिक वाहन (EV) बॅटरी तसेच इतर प्रगत तंत्रज्ञानाच्या निर्मितीत कोबाल्ट आणि निकेल या खनिजांचा प्रामुख्याने वापर केला जातो. पृथ्वीवर या खनिजांचे साठे अत्यंत दुर्मिळ आहेत. निप्पॉन फाऊंडेशन आणि टोकियो विद्यापीठाने विशिष्ट गॅजेटच्या मदतीने खोल समुद्रात सर्वेक्षण करुन हा खजिना शोधला आहे.
एका अहवालानुसार प्रथम 2016 मध्ये मँगनीज नोड्यूलचे क्षेत्र ओळखले गेले होते. यानंतर त्याचे तपशीलवार मॅप तयार करण्याक आला. क्षेत्राच्या अभ्यासातून साठ्याची अविश्वसनीय व्याप्ती समोर आली. यात 610,000 मेट्रिक टन कोबाल्ट आणि 740,000 मेट्रिक टन निकेलचा समावेश आहे. ही खनिजे केवळ ईव्ही बॅटरीसाठीच नव्हे तर जेट इंजिन, गॅस टर्बाइन आणि विविध उच्च-तंत्र उत्पादन प्रक्रियांसाठीही महत्त्वाची आहेत. तांब्याचे अतिरिक्त ट्रेस देखील सापडले ज्यामुळे साइटची आर्थिक क्षमता वाढवणारी आहे.
आधुनिक उद्योगांमध्ये कोबाल्ट आणि निकेल या खनिजांचा वापर केला जातो. ऊर्जा साठवण प्रणाली आणि हरित तंत्रज्ञानामध्ये त्यांची विशेष भूमिका आहे. जगभरातील देश शाश्वत ऊर्जा भविष्याकडे वाटचाल करत असताना, या धातूंची मागणी पूर्ण करणे कठिण झाले आहे. जपानमध्ये नव्याने सापडलेल्या साठ्यामुळे देशाचे परदेशी आयातीवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. या साठ्यांचा वापर करून, जपानला एक स्वयंपूर्ण पुरवठा साखळी स्थापन करण्याची, देशांतर्गत उद्योगांना बळकट करण्याची आणि तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक नेता म्हणून प्रस्थापित करण्याची संधी मिळणार आहे.