Video : आई ती आई असते! बेशुद्ध पिल्लाला तोंडात धरून ती पोहोचली दवाखान्यात अन् मग..., हृदयस्पर्शी व्हिडीओ Viral

Viral Video : आई ती आई असते असं आपण कायम म्हणतो. आपल्या बेशुद्ध पिल्लाला पाहून तिला काळजी वाटली, पिल्लाला तोंडात धरून ती पशुवैद्यकीय रुग्णालयात आली, हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले.     

नेहा चौधरी | Updated: Jan 21, 2025, 09:11 PM IST
Video : आई ती आई असते! बेशुद्ध पिल्लाला तोंडात धरून ती पोहोचली दवाखान्यात अन् मग..., हृदयस्पर्शी व्हिडीओ Viral  title=

Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदाला व्हायरल होत असतात. पण त्यातील काही व्हिडीओ आपलं लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचा मनाला जाऊन भेडतोय. हा व्हिडीओ पाहून एकच वाक्य तोंड येतं आई ती आई असते. हो, माणूस असो किंवा प्राणी हे आपल्या मुलांबद्दल खूप जिव्हाळा असतो. माणसांप्रमाणेच प्राणीही आपल्या पिल्लांची काळजी घेतात. आपल्या मुलांवर प्रेम, माया हे प्राणीही करतात. हेच दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एक मादी श्वानाने तिच्या बेशुद्ध पिल्लाला तोंडात धरून त्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात येते. हा प्रकार रुग्णालयाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झालाय. ती आपल्या पिल्लासह क्लिनिकच्या दारात उभी असल्याच पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित होतात. 

हे दृष्य पाहून कोणीही भावूक होईल. खरंच एक आई आपल्या मुलांना कधीही वेदनेमध्ये पाहू शकत नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मोदी श्वान पावसात बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पिल्ल्याला ती जबड्यात घेऊन रुग्णालयात येते. रुग्णालयाच्या दारात आल्यावर ती पिल्लाला दारासमोर ठेवते अन् फेरी मारते. हे पाहून डॉक्टर बाहेर येतात आणि त्या पिल्लाला आत घेऊन जातात आणि त्याच्यावर उपचार सुरु करतात. 

त्यावेळी पिल्लाच्या शरीरात कोणतीही हालचाल दिसली नाही. यानंतर डॉक्टरांनी मुलाचे हृदयाचे ठोके तपासले आणि तो अजूनही चालत असल्याचे आढळून आले. यानंतर डॉक्टरांनी मुलावर उपचार सुरू केले आणि त्याला शुद्धीवर आणण्यात यश आले. उपचारादरम्यान मादी कुत्री आपल्या मुलाजवळ उभी राहून त्याला पाहत राहते.

ही हृदयस्पर्शी घटना तुर्कस्तानमधून समोर येत आहे. जिथे पिल्लाची आई त्याच्या उपचारासाठी त्याला बेलीकडुझु अल्फा व्हेटर्नरी क्लिनिकमध्ये घेऊन जाते. क्लिनिकच्या दारात कुत्रा उभा असल्याचे पाहून डॉ. अमीर आणि डोगन कुत्र्याजवळ जातात आणि नंतर बाळाला आपल्या मांडीत उचलून उपचारासाठी आत घेऊन जातात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Petlican (@petlican)

हा व्हिडिओ रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने @beylikduzu_alfa_veteriner या त्याच्या Instagram पेजवर शेअर केला आहे . ज्याला आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि 5.5 लाख लोकांनी लाइक केले आहे.