Wedding Bells : कतरिना - विक्कीच्या लग्नावर सलमानच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

विकी - कतरिना लवकरच अडकणार विवाहबंधनात 

Updated: Nov 26, 2021, 11:32 AM IST
Wedding Bells : कतरिना - विक्कीच्या लग्नावर सलमानच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत.  डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कतरिना आणि विकी राजस्थानच्या 700 वर्ष जुन्या किल्ल्यात शाही शैलीत सात फेरे घेतील, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स दिसणार आहेत.

कतरिना आणि विकी कौशल यांनी अद्याप त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. एवढेच नाही तर त्यांनी त्यांचे नाते अधिकृतही केलेले नाही. अशा परिस्थितीत या जोडप्याच्या लग्नाशी संबंधित सर्व गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत, त्यांच्या रोका सेरेमनीपासून ते त्यांच्या हनीमूनपर्यंतच्या सगळ्या गोष्टींवर चर्चा रंगली आहे. 

कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या बातम्यांवर प्रत्येक बॉलिवूड स्टार मौन पाळण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आता सलमान खानचे वडील सलीम खान यांनी या चर्चांवर मौन सोडले आहे. कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या बातम्यांवर सलीम खानने आपलं मत मांडलं आहे.

सलीम खान यांनी सोडलं मौन, पहिली प्रतिक्रिया 

सलीम खानच्या एका मुलाखतीदरम्यान कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाच्या बातमीवर मत विचारण्यात आलं होतं. यावेळी सलीम खान म्हणाले, 'यावर मी काय बोलू... आजकाल फक्त मीडियालाच या विषयावर बोलायचे आहे.'

सलमान आणि कतरिनाचे चांगले संबंध 

कतरिना कैफ आणि सलमान खान यांच्या कुटुंबात खूप चांगले संबंध आहेत. एक काळ असा होता की, कतरिना आणि सलमान एकमेकांना डेट करायचे. त्या दिवसांमध्ये बॉलिवूडमध्ये त्यांच्या नात्याच्या बातम्या येत होत्या. 

मात्र, दोघांचे ब्रेकअप झाले. पण आजच्या काळात कतरिना आणि सलमान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि सलमान खानचे कुटुंब देखील कतरिना कैफसोबत खूप प्रेमाने राहतात. अनेक कार्यक्रमात हे दोघं एकत्र दिसतात. 

विकी - कतरिना करणार कोर्ट मॅरेज 

कतरिना कैफ आणि विकी कौशल 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान राजस्थानमधील सिक्स सेन्सेस बरवारा फोर्ट हॉटेलमध्ये विधींनुसार लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारीही येथे सुरू झाल्याचा दावा केला जात आहे.

मात्र, राजस्थानपूर्वी कतरिना आणि विकी कौशलही कोर्ट मॅरेज करणार आहेत. पुढील आठवड्यात दोघेही कोर्ट मॅरेज करू शकतात, असही म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोघांचेही चाहते खूप उत्सुक आहेत.