मुंबई : अभिनेता सलमान खानच्या 'रेडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री कुब्रा सैत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री कुब्रा सैतने नुकतंच तिचं 'ओपन बुक: नॉट क्वाइट अ मेमोयर' हे पुस्तक लाँच केलं आहे. यामध्ये तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
कुब्राने तिच्या 'ओपन बुक' या पुस्तकात तिच्या गर्भपाताची धक्कादायक गोष्ट शेअर केली आहे. 'आई वाज़ नॉट रेडी टू बी ए मदर' या तिच्या पुस्तकातील एका चॅप्टरमध्ये कुब्राने मद्यपान केल्यानंतर मित्रासोबत कसा टाईम स्पेंण्ड केला हे सांगितलं. या वन नाईट स्टँडनंतर कुब्रा सैत गरोदर राहिली आणि यानंतर तिने गर्भपात केला.
2013 मध्ये कुब्रा सैत अंदमानला वेकेशनसाठी गेली होती. त्यावेळी ती 30 वर्षांची होती. तिच्या ओपन बुक या पुस्तकात कुब्ब्राने बंगळुरूमधील तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल गोष्टींचा मोठा खुलासा केला आहे. तिच्यासोबत घडलेल्या बॉडी शेमिंग आणि लैंगिक शोषणासारख्या अनेक घटनांबद्दल तिने विस्तृतपणे लिहिलं आहे.
कुब्रा सैतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, जेव्हा तिची प्रेग्नंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली तेव्हा तिला काय वाटलं आणि तिने ते कसं घेतलं याविषयीही सांगितलं. एका मुलाखतीमधील संभाषणात कुब्रा म्हणाली, आपला मुद्दा पुढे नेत बॉलीवूड अभिनेत्री कुब्रा सैतने सांगितलं की, त्यावेळी ती यासाठी तयार नव्हती आणि तिला वाटतं की ती अजूनही यासाठी तयार नाही.
''23 व्या वर्षी लग्न आणि 30 व्या वर्षी मूल जन्माला घालण्यासाठी महिलांवर दबाव टाकला जातो आहे हे मला समजत नाही. मला हे माहित होतं की, मी यासाठी तयार नाही आणि मी माझ्या आयुष्यात घेतलेल्या निर्णयाबद्दल मला कोणताही पश्चात्ताप नाही."
गर्भपात झाल्यानंतर कुब्राला काय वाटलं यावर ती म्हणाली, ''नक्कीच मला एका भयानक व्यक्तीसारखं वाटत होतं, पण मी असं का केलं याचं मला वाईट वाटलं नाही, मात्र मला याची भीती वाटत होती की, लोकं याबद्दल काय म्हणतील. ते समजून घ्या कधीकधी स्वत: ला मदत करणं कठीण होऊ शकतं. मात्र तुम्हाला हे करावं लागेल."
अभिनेत्री कुब्रा सैतने अभिनेता सलमान खानच्या रेडी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिच्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिची खूप छोटी भूमिका होती पण त्यानंतर अभिनेत्रीने 'जवानी जानेमन', 'सुलतान', 'सिटी ऑफ लाइफ' सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं. 'सेक्रेड गेम्स' या ओटीटी शोमधून तिला वेगळी ओळख मिळाली आहे.