Sambhavna Seth On Miscarriage: संभावना सेठ आणि अविनाश मिश्रा त्यांच्या चाहत्यांना आनंदाची बातमी देण्यासाठी सज्ज झाले होते. संभावना सेठ तीन महिन्यांची गरोदर होती आणि 18 डिसेंबर 2024 रोजी ती तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर करणार होती. परंतु, हा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस ठरला. दरम्यान या दिवशी संभावनाचा गर्भपात झाला. आता अभिनेत्रीची अवस्था वाईट आहे.
दरम्यान, अविनाश आणि संभावना यांनी गर्भपाताची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. या जोडप्याच्या लग्नाला आठ वर्षे झाली असून दोघे अनेक दिवसांपासून मुलाची प्लानिंग करत होते. संभावनाचे पती अविनाश यांनी म्हटले की, संभावना तीन महिन्यांची गरोदर होती. ती ही आनंदाची बातमी सांगणार होती. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी खूप प्लॅनिंग केलं होतं आणि गरोदरपणात जास्तीची खबरदारीही घेतली होती. पण अशातच अभिनेत्रीचा गर्भपात झाला.
काय म्हणाले होते डॉक्टर?
संभावनाच्या गर्भधारणेच्या शक्यतेबद्दल बोलताना अविनाशने सांगितले की, त्यांच्या बाळासाठी सर्व काही चांगले होत आहे आणि त्याच्या हृदयाचे ठोकेही देखील वाढत होते. डॉक्टरांनी तिला सांगितले की तिला जुळी मुले असू शकतात, परंतु नुकत्याच झालेल्या स्कॅनमध्ये तिने तिचे बाळ गमावले. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले की सर्व काही इतकं व्यवस्थित चालले होते, डॉक्टरांनी देखील जुळे असण्याची शक्यता असल्याचं म्हटलं होतं. आम्ही खूप उत्साही आणि खूप आनंदी होतो. पण 3 महिन्यांमध्येच गर्भपात झाला. मला संभावनाबद्दल खूप वाईट वाटते.
बाळासाठी घेतली 65 इंजेक्शन
संभावना आणि अविनाशने पुढे सांगितले की, गेल्या तीन महिन्यांत त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. संभावनाने सांगितले की संपूर्ण कोर्समध्ये तिने 65 इंजेक्शन्स घेतली. ती खूप वेदनादायक होती. परंतु तिने तिच्या मुलासाठी ती आनंदाने घेतली. त्यांना वाटले की इंजेक्शन बंद होतील तेव्हा मुलाचे हृदयाचे ठोकेही बंद झाले. अभिनेत्रीला गर्भपात करावा लागला. कारण ते शरीरासाठी सुरक्षित नव्हता.