या इव्हेंटमधील एक फोटो खूप चर्चेत आहे. या फोटोमध्ये शाहिद कपूर त्याच्या एक्स गर्लफ्रेंड करीना कपूरच्या मागे बसलेला दिसत आहे आणि दोघेही समोर पाहत हसताना दिसत आहेत. करीना पती सैफ अली खान आणि बहीण करिश्मा कपूरसोबत जेह अली खानला चिअर करत होती, तर शाहिद त्याच्या पत्नी मीरा राजपूतससोबत त्यांची मुलं मीशा आणि झैनसाठी आले होते.
हा फोटो पाहून चाहत्यांना 2007 चा प्रसिद्ध चित्रपट 'जब वी मेट' आणि त्यातील गाणी आठवली. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, 'गीत आणि आदित्य आता त्यांच्या मुलांसोबत आहेत, पण वेगळ्या पार्टनर्ससोबत!' तर दुसऱ्याने लिहिले, 'ते एकमेकांच्या उपस्थितीत थोडे अस्वस्थ दिसत होते, पण चेहऱ्यावर एक उत्सुकता होती.' तिसऱ्या नेटकऱ्याने शाहिदच्या चेहऱ्यावरचे हावभाव लक्षात घेत लिहिले, 'शाहिदचा चेहरा सर्व काही सांगतो!'
शाहिद आणि करीना यांचा जुना रोमान्स चाहत्यांना चांगलाच माहित आहे. दोघे 'जब वी मेट' च्या शूटिंगदरम्यान एकमेकांना डेट करत होते. परंतु या चित्रपटाच्या प्रदर्शना आधीच त्यांचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर दोघे अनेक वर्षांनी 'उडता पंजाब' या चित्रपटात एकत्र दिसले, पण स्क्रीनवर त्यांचे एकत्र सीन नव्हते.
आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. करीना कपूर खानने सैफ अली खानशी लग्न केले असून ती तैमूर आणि जेह या दोन मुलांची आई आहे. दुसरीकडे, शाहिद कपूरने मीरा राजपूतशी लग्न केले असून ते मीशा आणि झैन या दोन मुलांचे पालक आहेत. या कार्यक्रमातील फोटो पाहून चाहत्यांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे, पण आता ते आपापल्या कुटुंबांसह आनंदी आयुष्य जगत आहेत.