Sanam Teri Kasam Box Office Collection Today: अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री मावरा हुसैन यांचा रोमँटिक चित्रपट 'सनम तेरी कसम' 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता, पण आता 9 वर्षांनी 7 फेब्रुवारी 2015 रोजी हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटाने मूळ प्रदर्शनाच्या कलेक्शन पेक्षा जास्त कमाई करण्यास सुरुवात केली. 'सनम तेरी कसम' चित्रपटाने स्वतःचाच विक्रम मोडला आहे.
रि-रिलीज होताच मोडले सर्व रेकॉर्ड
बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, जे रि-रिलीज करण्यात आले आहेत. अशातच नुकताच प्रदर्शित झालेला 'सनम तेरी कसम' या चित्रपटाने प्रदर्शित होताच बाजी मारली आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड गर्दी करत आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. फ्लॉप ठरलेला 'सनम तेरी कसम' चित्रपट रि-रिलीज होताच सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाने रि-रिलीजच्या पहिल्याच दिवशी 5.14 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 6.22 कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसांमध्ये चित्रपटाने 11.36 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर चित्रपट प्रदर्शित होऊन 4 दिवस उलटले आहेत. या 4 दिवसांमध्ये चित्रपटाने 30 कोटींची कमाई केली आहे.
अपूर्ण प्रेमकथा
तुमच्या माहितीसाठी 'सनम तेरी कसम' हा चित्रपट रोमँटिक आहे. ज्यामध्ये मावरा ही एक साउथ इंडियन मुलगी सरस्वतीच्या भूमिकेत दिसत आहे. परंतु, तिच्यासोबत कोणीही लग्न करण्यासाठी तयार होत नाही. तर हर्षवर्धन या चित्रपटात इंदरच्या भूमिकेत आहे. जो प्रत्येक क्षणाला सरस्वतीसोबत दिसत आहे. हा चित्रपट इंदर आणि सरस्वती यांच्या लव्ह स्टोरीवर आधारित आहे, जी शेवटी अपू्र्ण राहते.
'सनम तेरी कसम' चित्रपटाचा पार्ट-2 येणार?
या चित्रपटाची निर्मिती दीपक मुकुट यांनी केली आहे. चित्रपटाचे बजेट 25 कोटी रुपये होते. हर्षवर्धन राणे आणि मावरा हुसैन व्यतिरिक्त या चित्रपटात अनुराग सिन्हा, मनीष चौधरी, मुरली शर्मा आणि सुदेश बेरी हे देखील चित्रपटात दिसले. अशातच आता सोशल मीडियावर एक प्रश्न विचारण्यात आला की या चित्रपटाचा दुसरा भाग बनवला जात आहे का? यावर हर्षवर्धन राणे यांनी सांगितले की, सध्या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम सुरू नाही आणि 'सनम तेरी कसम 2' साठी अद्याप काहीही नियोजन केलेले नाही.