मुंबई : बॉलिवूडचा 'खलनायक' संजय दत्तची मोठी मुलगी त्रिशाला दत्तने चित्रपट जगतापासून लांब राहणं पसंत केलं आहे. मात्र, असं असूनही ती अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात असते. त्रिशाला सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची यादीही बरीच मोठी होत आहे. चित्रपटांपासून दूर असूनही सोशल मीडियावर त्रिशलाच्या फॉलोअर्सची यादी सुपरस्टारपेक्षा कमी नाही.
त्रिशालाने ठेवलं होतं डिप्रेशनवर लाइव सेशन
जरी त्रिशला अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत पोस्ट करते, पण यावेळी तिने डिप्रेशवर एक लाईव्ह सेशन ठेवलं होतं. यादरम्यान तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरंही दिली आहेत. मात्र, या दरम्यान, तिच्या एका चाहत्याने तिला असा प्रश्न विचारला, जो प्रश्न पाहून त्रिशालाही कदाचित काही काळ आश्चर्य वाटलं असावं.
फॅनने केलं लग्नासाठी प्रपोज
एका चाहत्याने त्रिशाला लग्नाचा प्रस्ताव दिला. यानंतर, ज्या पद्धतीने चाहत्याने उत्तर दिलं, जे खूप सुंदर होतं. फॅनने लिहिलं, 'मिस दत्त तुम्ही कधीही माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. तू माझ्याशी लग्न करशील का?' यावर, संजय दत्तच्या मुलीने प्रतिसादात लिहिलं की, 'मी उत्तर देत नाही कारण याचा मानसिक आरोग्याशी काहीही संबंध नाही.'
त्रिशालाच्या उत्तराने जिंकली मनं
त्रिशालाने पुढे या उत्तरात लिहिलं, 'डेटिंगच्या बाबतीत माझं नशीब चांगलं नाही. का नाही ... खुश? ' आता त्रिशालाचा हा साधेपणा आणि सुंदर उत्तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांना तिची ही शैली खूप आवडली आहे.