"ए टॉम्या तुझ्या ...", Tom Cruise चा फोटो शेअर करत संतोष जुवेकरचं चाहत्यांना आवाहन

Santosh Juvekar's Post for Tom Cruise : मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत टॉम क्रुझसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 10, 2023, 05:36 PM IST
"ए टॉम्या तुझ्या ...", Tom Cruise चा फोटो शेअर करत संतोष जुवेकरचं चाहत्यांना आवाहन title=
(Photo Credit : Santosh Juvekar Instagram)

Santosh Juvekar's Post for Tom Cruise : मराठी चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर हा नेहमीच त्याच्या सोशल मीडियामुळे चर्चेत येतो. संतोष सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सोशल मीडियावर संतोष त्याचे अनेक फोटो आणि पोस्ट शेअर करत त्याचं मत मांडताना दिसतो. दरम्यान, नुकतीच संतोषनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पोस्टमध्ये संतोष जुवेकरनं स्वत: चा नाही तर हॉलिवूडचा जबरदस्त आणि लोकप्रिय अभिनेता टॉम क्रूजला टॅग करत काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

संतोषनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये संतोषनं टॉम क्रुझचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र, या फोटोत एकटा टॉम क्रुझ नाही तर त्याच्या सारखे दिसणारे दोन व्यक्ती आहेत. हे फोटो पाहून नक्की कोणता टॉम क्रुझ आहे हे मात्र, ओळखणं खूप कठीण आहे. तर हा फोटो शेअर करत संतोष, म्हणाला “जर हा फोटो खरा असेल तर असा सेम कुणी माझ्यासारखाच दिसणारा असेल तर मला फोटो पाठवा. एकाच वेळेला खूप कामं आली तर वाटून घेता येतील. खरंच पाठवा आणि मला टॅग करा. एकमेका सहाय्य करू अवघे मिळवू यश. ए टॉम्या तुलापण टॅग केलंय. तू पण पाठवू शकतोस बरं का तुझा फोटो. तुझ्या आधार कार्डवरील फोटो सारखाच दिसतो मी. काळजी करू नको, आपण सारखेच आहोत.” 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा  : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीच्या कारला अपघात, पोस्ट शेअर करत म्हणाली...

संतोष जुवेकरनं शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोवर कमेंट करत काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की हा फोटो एआय जनरेटेड म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सच्या मदतीनं बनवलेले आहेत. तर काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की हे दोन टॉम क्रुझचे बॉडी डबल आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, "तुमच्या सारखा दिसणारा मुंब्राला एक माणूस आहे पण तो मुसलमान आहे." दुसरा नेटकरी म्हणाला, "तुझ्यासारखे दिसणारे भरपूर भेटतील दादा. पण तुझ्यासारखा अभिनय करणार भेटणार नाही." तिसरा नेटकरी म्हणाला, "दादा तुझ्यासारखे दिसणारे खूप भेटतील पण अभिनयाचं काय तु जो हृदयाला भिडणरा अभिनय करतो तो दुसरा कोणीच नाही करू शकत." आणखी एक नेटकरी म्हणाला, "कोल्हापुरमध्ये एका मित्राचा मामा आहे. झेंडा चित्रपटातला तुमचा लूक जसा आहे तसाच दिसतो." दुसरा नेटकरी म्हणाला, "तुझ्यासारखा दिसणारा नाही पण तुझ्यासारखा आवाज माझ्या भावाचा आहे." तिसरा नेटकरी म्हणला, "मी तुमच्यासारखे भरपुर पाहिले. ब्रॅंड आहे तर त्याचे कॉपी असणारच ना.