Lappu sa sachin song : पाकिस्तानात बसून पब्जी खेळता खेळता भारतातील सचिन मीणाच्या प्रेमात वेडी झालेली सीमा हैदर भारतात आली. पाकिस्तानसोडून सचिनसोबत राहण्यासाठी सीमा तिच्या मुलांनाही घेऊन आली आहे. सीमा हैदर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. त्या दोघांच्या लव्ह स्टोरीवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान, आता सचिनची शेजारीनं सीमाच्या भारतात येण्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. त्याची शेजारी काय म्हणाली त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यावर अनेक मीम व्हायरल होत आहेत. तर आता सचिन आणि सीमाच्या लव्ह स्टोरीवर एक गाणं व्हायरल झालं आहे.
शेजारी राहणाऱ्या या महिलेच्या वक्तव्यावर यशराज मुखातेनं गाणं बनवलं आहे. यशराज मुखातेनं तयार केलेलं हे गाणं ऐकून सगळ्यांनाच हसू अनावर झालं आहे. अनेकांच्या पोटात दुखू लागलं आहे. या गाण्याला ‘लप्पू सा सचिन…’ असं नाव यशराजनं दिलं आहे. हे नाव यशराजनं शेजारी राहणाऱ्या महिलेच्या एका वाक्यातून घेतलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. त्या महिलेचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ तिच्या एका मुलाखतीतील होता. त्या व्हिडीओत ती महिला बोलते की ‘प्यार के लिए कोई कारण होना चाहिए. नॉर्मल सी बात है, आदमी तो होना चाहिए. वो कीड़ा सा लड़का है… झींगुर सा लडका.. सूखा, कभी तेज हवा चल गई ना, तो पता नहीं कितनी दूर जाके पड़ेगा. ढूंढे से भी नहीं मिलेगा वो.’
हेही वाचा : पॉर्नस्टार मिया खलिफानं लग्नाविषयी दिला 'हा' सल्ला, तुम्हाला पटतोय का?
यशराजनं त्या व्हिडीओला पाहून हे गाणं बनवलं आहे. यशराजनं शेअर केलेला हा व्हिडीओ 3 लाख 30 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. यशराजनं त्या महिलेच्या वक्तव्यातील काही वाक्य घेत त्याला खूप फनी बनवलं आहे. यशराजच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट करत आहेत. अनेकांनी त्या महिलेच्या चिडचिडवर यशराजनं ज्या प्रकारे म्युजिकचा तडका दिला आहे ते प्रचंड आवडलं आहे. एक नेटकरी म्हणाला की '15 मिनिटांपासून हे रीपिटवर ऐकत आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'भारतातील प्रत्येक सचिनला आता खूप वाईट वाटत असेल.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'इतक्या कठीण गोष्टीतून कसं काय एक गाणं बनवलं, हे अपेक्षित नव्हतं.खरंच आश्चर्य वाटतंय.' (seema haidar and sachin love story)