मुंबई : बॉलिवूडचा किंग खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अलिबागमध्ये असलेल्या विलावर आयकर विभागाची करडी नजर आहे.
या अलिबागच्या फार्म हाऊससाठी शाहरूख खानने खोटी माहिती दिल्याचा आरोप केला जातोय. एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली आहे. तक्रारीत देजा वु फॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ, काही अज्ञात लोक आणि शासकीय अधिकायांच्या नावांचा समावेश आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल झाल्यानंतर आयकर विभागाने देजा वु फॉर्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन शेअरधारकांची चौकशी केली आहे. शिवाय त्यांचे जबाबही नोंदवून घेतले आहेत.
अलिबागमध्ये समुद्र किनारी असलेली ही शेत जमीन खरेदी करण्यासाठी एक कंपनी तयार करण्यात आली आहे. तसेच शाहरूखच्या या कंपनीला लोन देखील देण्यात आले आहे. या कंपनीवर ८.४५ करोड रुपयांचे लोन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या कंपनीने जे बांधकाम केले त्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केले आहे.
समुद्राच्या किनाऱ्यावर असलेला शाहरूखचा बंगला पाच बंगले बांधता येतील एवढ्या परिसरात बांधण्यात आला आहे. या बंगल्यात एक हेलिपॅड आणि स्विमिंग पूल आहे. शाहरूखवर असा आरोप ठेवण्यात आला की, त्याने अलिबागमध्ये शेती करण्यासाठी जमीन अधिग्रहीत केली अन् त्यावर बंगला बांधला. तक्रारकर्ते सुरेंद्र धावले यांनी ११ जानेवारी २०१७ रोजी खार पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदविली आहे. आता धावले यांनी मागणी केली की, शाहरूखसह याप्रकरणात असलेल्या अन्य लोकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जावा. त्यामुळे आता शाहरूखच्या अडचणीत वाढ.