Shahid Kapoor : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचे लाखो चाहते आहेत. शाहिद कपूर हा त्याच्या 'कबीर सिंग' या चित्रपटामुळे चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेकांना हा चित्रपट आवडला तर काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला. दरम्यान, शाहिदविषयी खूप निगेटिव्हीटीचा सामना करावा लागला होता. त्याच्यावर शारीरिक शोषणला प्रोत्साहन दिल्याचे म्हटले आहे. आता शाहिदनं यावर प्रतिक्रिया दिली असून त्यानं सांगितलं की त्यानं लहाणपणीच शारीरिक शोषण पाहिलं आहे. तर त्याचं म्हणणं आहे की प्रेमात कोणालाही दुसरी संधी मिळायला हवी.
शाहिद याविषयी बोलताना म्हणाला, "लहाण वयात मी शारीरिक शोषण पाहिलं आहे. मला माहित आहे तुम्ही कशाविषयी बोलत आहात. पण ती एका भोळ्या आणि टॅलेन्टेड मुलीची आणि रागीट आणि बिथरलेल्या मुलाची खराब लव्ह स्टोरी होती. हे साधारणपणे आयुष्यात होत राहतं."
पुढे याविषयी बोलताना शाहिद म्हणाला, "माझं हे मत आहे की प्रेमात कधीच काही वाईट घडत नाही? आपण सर्व परिपूर्ण आहोत का? प्रत्येकाला दुसरी संधी हवी आहे. तुम्ही म्हणाल हा मुलगा खूप चांगला मुलगा आहे. हा सगळं चांगल करतो, खरंतर असं कोणी बोलत नाही. तुम्ही जाऊन प्रोमो पाहा प्रत्येक वाक्यात म्हटलं आहे की तो डिस्टर्ब आहे. त्याला राग येतो. त्याला हे जग अक्सेप्ट करत नाही आहे. कुठेच म्हटलेलं नाही की तो चांगला मुलगा आहे. पण मला वाटतं की काही लोकांसाठी हे योग्य आणि अयोग्य दोन्ही होते. मला वाटतं की आयुष्यात सगळं होतं आणि आपण ते दाखवले पाहिजे."
पुढे कबीर सिंगच्या भूमिकेविषयी बोलायचे झाले तर ती भूमिका ना हीरो आणि नाही एॅन्टी हीरो या कॅटेरगीत दिसते. त्याच्यासाठी ही फक्त एक स्टोरी होती, असं शाहिद म्हणाला.
हेही वाचा : " स्वत: अफेअर्स विषयी सांगून त्यानं मुलीच्या...", नवाजुद्दीन सिद्दीकीवर संतापली आलिया
शाहिद विषयी बोलायचे झाले तर त्यानं नुकतीच त्याच्या पत्नीसोबत लग्नाचा 9 वा वाढदिवस साजरा केला. त्यानं मीरासोबत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता.यावेळी त्यानं मीराला तिचं त्याचं घरं असल्याचे म्हटलं होतं. याचा अर्थ जिथे मीरा असेल ते त्याचं घर असेल असं त्याचं म्हणणं आहे. शाहिदचा नुकताच 'ब्लडी डॅडी' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेकांनी शाहिदची भूमिका आणि त्याचा अभिनय पसंतीस उतरल्याचे सांगितले. या चित्रपटाला चांगली रेटिंग्स देखील मिळाले आहेत.