शहनाज गिल पुन्हा प्रेमात; रोमॅन्टिक अंदाजात दिसली अभिनेत्री

अभिनेत्री शहनाज गिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Updated: May 28, 2022, 02:42 PM IST
शहनाज गिल पुन्हा प्रेमात; रोमॅन्टिक अंदाजात दिसली अभिनेत्री title=

मुंबई : 'कभी ईद कभी दिवाळी' सध्या चर्चेत आहे. सुपरस्टार सलमान खान त्याच्या स्टारकास्टमुळे चर्चेत आला आहे. याआधी हा चित्रपट अर्शद वारसी आणि श्रेयस तळपदेच्या एंट्री आणि एक्झिटमुळे चर्चेत राहिला होता. या अभिनेत्यांच्या जागी आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांनी चित्रपटात प्रवेश केला पण प्रकरण ईथेच संपलं नाही तर. अलीकडच्या काळात हे दोन्ही कलाकार चित्रपटातून बाहेर पडणार असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

सध्या बातम्या येत आहेत की, 'बिग बॉस 13' फेम शहनाज गिल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आता ताज्या रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, शहनाज गिल 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात पंजाबी अभिनेता आणि गायक जस्सी गिलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. शहनाजला जरी खऱ्या आयुष्यात तिचं प्रेम अद्याप मिळालं नसलं तरी या सिनेमासाठी तिला तिचं प्रेम मिळालं आहे. त्यामुळे सिनेमात शहनाजला चाहते रोमँन्टिक अंदाजात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

या सिनेमात शेहनाज रोमँन्टिक अंदाजात दिसणार आहे असं म्हटलं जात आहे. या आधी शहनाज खऱ्या आयुष्यात सिद्धार्थ शुक्लाच्या नात्यामुळे चर्चेत होती. सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तो फक्त 40 वर्षांचा होता. सिद्धार्थच्या अचानक जाण्याच्या दुःखामुळे शहनाज महिनाभर घराबाहेरही पडली नाही.