'या' गंभीर आजाराला झुंज देतेय ‘कांटा लगा’ गर्ल

आजारामुळे अभिनेत्रीच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं झालं...  

Updated: Dec 6, 2021, 01:42 PM IST
'या' गंभीर आजाराला झुंज देतेय ‘कांटा लगा’ गर्ल   title=

मुंबई : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शेफाली जरीवाला म्हणजे चाहत्यांची आवडती 'काटा लगा गर्ल'. नुकताचं झालेल्या एका मुलाखतीत शेफालीने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. शेफालीने तिला असलेल्या गंभीर आजाराबाबत सांगितले की, 15 वर्षांची असल्यापासून शेफाली एका गंभीर आजाराला झुंज देत आहे. या आजारामुळे शेफालीला तिच्या करियरमध्ये हवं तसं काम करता आलं नाही. 

2002 मध्ये जेव्हा शेफालीचं 'कांटा लगा' गाणं प्रदर्शित झालं तेव्हा लोकांना वाटले की ही शेफाली उद्याची प्रसिद्ध अभिनेत्री असेल, पण तसे होऊ शकले नाही. शेफाली लाइमलाइटच्या जगापासून दूर गेली. शेफालीने अनेक प्रोजेक्टमध्ये कामही केले नाही. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने यामागचे कारण सांगितले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शेफाली जास्त कामाचा भार उचलू शकत नाही. वेबसाइटशी बोलताना शेफाली म्हणाली, 'मला वयाच्या 15 व्या वर्षी epilepsy seizures अटॅक आला होता. मला आठवतंय की, तेव्हा मी शाळेत होते आणि माझ्यावर अभ्यासाचा प्रचंड भार होता. तणाव आणि चिंतेमुळे मला epilepsy seizuresचे झटके येऊ लागले. 

पुढे शेफाली म्हाणली, 'कांटा लगा' नंतर लोकांनी मला विचारले की मी जास्त काम का करत नाही.  माझ्या आजारपणामुळे मी काम केले नाही कारण मी कामाचा जास्त दबाव घेऊ शकत नाही.' आजारपणामुळे 'काटा लगा' गर्ल करियरमध्ये अधिक काम करू शकली नाही. पण शेफाली तिच्या 'कांटा गला' गाण्यामुळे कायम चर्चेत असते.