शिल्पाने लग्नात घातली होती इतक्या कोटींची अंगठी आणि साडी

शिल्पा शेट्टी बॉलिवूडच्या काही सुंदर अभिनेत्रींच्या यादीत येते. तिचे भारतात अनेक फॅन्स आहेत. शिल्पा शेट्टीचं जेव्हा लग्न ठरला तेव्हा ती नक्की कोणासोबत लग्न करतेय आहे याबाबत अनेकांना उत्सूकता होती. 22 नोव्हेंबरला शिल्पाच्या लग्नाच्या वाढदिवस असतो.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 23, 2017, 03:06 PM IST
शिल्पाने लग्नात घातली होती इतक्या कोटींची अंगठी आणि साडी title=

मुंबई : शिल्पा शेट्टी बॉलिवूडच्या काही सुंदर अभिनेत्रींच्या यादीत येते. तिचे भारतात अनेक फॅन्स आहेत. शिल्पा शेट्टीचं जेव्हा लग्न ठरला तेव्हा ती नक्की कोणासोबत लग्न करतेय आहे याबाबत अनेकांना उत्सूकता होती. 22 नोव्हेंबरला शिल्पाच्या लग्नाच्या वाढदिवस असतो.

इतक्या लाखांची होती साडी

शिल्पा तिच्या लग्नामध्ये इतकी सुंदर दिसत होती की उपस्थितांची नजरच तिच्यावरुन हटत नव्हती. यावेळी शिल्पाने घातलेली साडी आकर्षणाचा केँद्रबिंदु होती. शिल्पाने डिझायनर तरुण तहिलयानीकडून साडी डिझाईन करुन घेतली होती. तर राज कुंद्रा शेरवानीमध्ये होता. या साडीची किंमत ५० लाख रुपये होती.

पंजाबी आणि कर्नाटक पद्धतीने लग्न

शिल्पाचं लग्न पंजाबी आणि कर्नाटक पद्धतीने झाली. कनार्टकच्या राहणाऱ्या शिल्पाने लग्नात तिच्या समाजाची सर्व पंरपरा पार पाडली. शिल्पा तुलू समाजाच्या पद्धतीने सजली होती. शिल्पाने 22 नोव्हेंबर 2009 मध्ये लग्न केलं. शिल्पा आणि राज कुंद्राने डेस्टिनेशन वेडिंग केली होती.

३ कोटींची अंगठी

शिल्पाने तिच्या साखरपुड्यात चक्क ३ कोटींची अंगठी घातली होती. ही अंगठी देखील त्या वेळेस चर्चाचा विषय बनली होती. मुंबई जवळच्या खंडाळामध्ये शिल्पाचं लग्न झालं होतं. राज कुंद्रा ब्रिटेनमधले बिझनेसमॅन आहेत.

बॉलिवूड कलाकारांची हजेरी

शिल्पाच्या विवाहासाठी सनी देओल, सुनील शेट्टी, वासु भगनानी आणि जैकी भगनानी उपस्थित होते. शिवाय राज कुंद्रा आणि शिल्पाचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. बॉलिवूडचा कोरिओग्राफर गणेश हेगडेच्या मदतीने सेट तयार करण्यात आला होता. लग्नानंतर २ दिवसांनी शिल्पा आणि राजने मुंबईमध्ये रिशेप्शन दिलं होतं. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.