600 कोटींच्या कमाईनंतर देखील श्रद्धा कपूर 'या' बाबतीत दीपिका पादुकोणला टक्कर देऊ शकत नाही

'स्त्री 2' चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर श्रद्धा कपूरचे नाव सर्वत्र चर्चेत आहे. 2024 मधील सर्वात हिट चित्रपट देऊन श्रद्धा कपूरने अनेक मोठ्या चित्रपटांना मात दिली आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 1, 2024, 07:26 PM IST
600 कोटींच्या कमाईनंतर देखील श्रद्धा कपूर 'या' बाबतीत दीपिका पादुकोणला टक्कर देऊ शकत नाही title=

Shraddha Kapoor : 'स्त्री 2' हा चित्रपट 2024 मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. 'स्त्री 2' चित्रपटाने 2024 मधील अनेक चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर 457 कोटींहून अधिक कमाई केली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या करिअरमधील 'स्त्री 2' हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 'स्त्री 2' चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूरचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने अत्यंत साधेपणाने तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर मांडली आहे.

1000-1000 कोटी रुपयांचे 3 चित्रपट

अभिनेत्री दीपिका पादुकोणचा करिअरचा आलेख खूप चांगला आहे. तिच्या हातात अनेक चित्रपट आले आहेत. इतकेच नाही तर दीपिका पादुकोण ही एकमेव अभिनेत्री आहे जिने बॉक्स ऑफिसवर 1000-1000 कोटी रुपयांचे 3 चित्रपट दिले आहेत. दीपिका पादुकोणचा हा रेकॉर्ड मोडणे खूप कठीण आहे. पण श्रद्धा कपूरला अजून काही वेगळे करण्याची संधी मिळालेली नाही. तर दीपिकाला वेगवेगळ्या संधी मिळत राहतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

फाइटर : 2024 च्या सुरुवातीला ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा 'फाइटर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिका हाय ऑक्टेन अॅक्शन सीन करताना दिसली होती. 

'पठाण : दीपिका पादुकोणचा 1000 कोटींचा पहिला चित्रपट 'पठाण' तिच्यासाठी अनेक अर्थांनी खास आहे. या चित्रपटामधील दीपिकाची शाहरुख खानसोबतची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. 

बाजीराव मस्तानी : रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा सुपरहिट चित्रपट 'बाजीराव मस्तानी' हा देखील हिट ठरला होता. हा चित्रपट चाहत्यांना देखील खूप आवडला होता.  अभिनेत्री या चित्रपटासाठी तलवारबाजीही शिकली होती.

चेन्नई एक्सप्रेस:  11 वर्षांपूर्वी जेव्हा दीपिका पादुकोण शाहरुख खानसोबत 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनेत्रीला तमिळ बोलताना पाहून प्रेक्षक देखील आश्चर्यचकित झाले होते. या चित्रपटासाठी अभिनेत्रीने तमिळ भाषेचे विशेष क्लासेस घेतले होते.