मुंबई : MTV वरील Hustle 2.0 या रॅपिंग शोची तरुणांमध्ये खूपचं क्रेझ आहे. या शोमधून चर्चेत आलेली रॅपर सृष्टी तावडे (Srushti Tawade) सध्या तरुणाच्या गळ्यातली ताईत बनली आहे. तिच्या प्रत्येक रॅप प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलाय. आता तिचा ''मेरा बचपन कहा गया?'' (mera bachpan kaha gaya) हा शनिवारी टेलिकास्ट झालेला रॅप चर्चेत आला आहे. हा ऱॅप सध्या प्रत्येक तरूणाच्या स्मार्टफोनमध्ये वाजतोय.
'भगवान बोल रहा हूँ...', मराठी पोट्टी पाहा 'रॅप' करायलीय!
सृष्टी तावडे (Srushti Tawade) ही एक उत्कृष्ट रॅपर आहे. तिने शोच्या सुरुवातीपासूनच विभिन्न विषयांवर ऱॅप केले आहेत. त्यामुळे तिचे रॅप नेहमीच इतक स्पर्धकांपेक्षा वेगळे राहीले आहेत. आता तिचा ''मेरा बचपन कहा गया?'' हा रॅप खुपच चर्चेत आला आहे. शनिवारी टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये तिने हा ऱॅप गायला होता. हा रॅप प्रेक्षकांना खुप आवडला आहे.
सृष्टी तावडेने (Rapper Srushti Tawade) ''मेरा बचपन कहा गया?'' (mera bachpan kaha gaya) हा नवीन रॅप गायला आहे. हा रॅप प्रेक्षकांना खुपच आवडला आहे. या रॅपमध्ये तिने लहानपणी आलेल्या एका वाईट अनुभवातून तो तयार केला आहे. यामध्ये तिने तिच लहानपणीचं आयुष्य कसं होत, व तिला कोणत्या वाईट अनुभवांना सामोरे जावे लागलं होत, याची रॅपच्या माध्यमातून गोष्ट सांगितली आहे.
या रॅपमध्ये लहानपणी तिची देखभाल करण्यासाठी एका केअर टेकरला ठेवण्यात आलं होत. या केअर टेकरच्या बॉयफ्रेंडने कसे तिला छळलं होत, हा वाईट अनुभव सांगण्यात आला आहे. तसेच या छळवणूकीनंतर तिची अवस्था काय होती, ही परीस्थिती तिने ऱॅपच्या माध्यमातून सांगितली आहे. हा रॅप प्रेक्षकांना पसंतीस उतरला आहे आणि प्रत्येत स्मार्टफोनवर वाजताना दिसत आहे.
दरम्यान या आधी सृष्टी तावडेने (Srushti Tawade) 'भगवान बोल रहा हूँ...', छोटा डॉन, डमिस गाईड फॉर मुंबई, चील किंडा गाय, मैं नहीं तो कौन असे अनेक रॅप गायले आहेत. हे ऱॅप देखील प्रेक्षकांना खुप आवडले आहेत.