हॉरर चित्रपटांचे बादशाह श्याम रामसे काळाच्या पडद्याआड

श्याम रामसे हे काही दिवसांपासून न्युमोनिया रोगाने त्रस्त होते.

Updated: Sep 18, 2019, 05:22 PM IST
हॉरर चित्रपटांचे बादशाह श्याम रामसे काळाच्या पडद्याआड  title=

मुंबई : बॉलिवूड मध्ये 'वीराना' आणि 'दो गज जमीन के नीचे' यांसारखे चित्रपट साकारणारे दिग्दर्शक श्याम रामसे यांचे निधन झाले आहे. श्याम ब्रदर्सपैकी एक असलेले श्याम रामसे यांनी वयाच्या ६७ वर्षात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी ८० ते ९० च्या दशकात हॉरर चित्रपटांचा बादशाह म्हणून ओळखले जात होते. सिनेविश्वात अप्रतिम हॉरर चित्रपटं साकारून त्यांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता. त्यांच्या अचानक जाण्याने कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. 

श्याम रामसे हे काही दिवसांपासून न्युमोनिया रोगाने त्रस्त होते. त्यांना मुंबईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी पाच वाजता त्यांचे निधन झाले, असे अमित रामसे यांनी सांगितले.

श्याम रामसे हे सात भावंडं होते. त्या सर्वांना रामसे ब्रदर्स म्हणून ओळखले जात असे. कराचीमधून मुंबईत आल्यानंतर त्यांनी भाऊ तुलसी रामसे सोबत बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरूवात केली. १९९३ ते २००१ पर्यंत चाललेली झी हॉरर शो ही त्यांनी भारतीय वाहिन्यांवर आणलेली पहिली मालिका ठरली. गत वर्षी तुलसी रामसे यांचे निधन झाले आहे.