मुंबई : गायक नकाश अजीजने १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर 'दरख्वास्त' असलेले एक गाणे प्रदर्शित केले आहे. या गण्याच्या माध्यामातून त्यांनी देशातील जनतेला प्रेमाणे एकत्र राहण्याचे अवाहन केले आहे. रोशन अब्बास हे या गाण्याचे सह-गायक असून नकाशने गाण्याला कंपोज केले आहे. हे गाणे अभिजीत सावंत, आदिती सिंह शर्मा, अमित साना, अमिताभ भट्टाचार्य, अनुषा मानी, अंतरा मित्रा, एश किंग, बेनी दयाल, दिव्या कुमार, हर्षदीप कौर, मीनल जैन, नकाश, राणा, शालमली खोलगडे, श्रुति पाठक आणि सोहम चक्रवर्ती यांनी गायले आहे.
पुलवामामध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात 40 भारतीय वीरजवानांना आपल्या प्राणाची आहूती द्यावी लागली. आतंकवादी संघटनांनी घडवलेल्या हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद जनसामान्यांपासून ते राजकीय, क्रि़डा, कलाविश्वात उमटताना दिसत आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ बॉलिवूड मंडळी फार टोकाचे पाउल उचलताना दिसत आहेत. कलाविश्वात पाकिस्तनी कलाकारांना बॅन करण्याच्या चर्चंना उधान येत आहे.