मुंबई : खूप वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेले सोनम कपूर आणि आनंद अहुजा आज लग्नबंधनात अडकले आहेत. हिंदू नाही तर पंजाबी पद्धतीने हे लग्न पार पडलं. मुंबईत ब्रांद्रामधील एका बंगल्यात हा सोहळा पार पडला. या लग्नाला सोनम कपूरने लाल रंगाचा लेहंगा घातला होता तर आनंदने गोल्डन रंगाची शेरवानी घातली होती. सोनमने लग्नात डिजाईनर अनुराधा वाकिल यांनी डिझाईन केलेला लेहेंगा घातला होता. तर मेंहदी कार्यक्रमालाही अनुराधाने डिझाईन केलेला ड्रेस घातला होता. सोनमच्या प्रत्येक सोहळ्यासाठी एक खास थीम ठेवण्यात आली होती. ट्रेडिशनल थीम असलेल्या लग्नसोहळ्यात सर्व मित्रमंडळी, बॉलिवूड सेलिब्रेटींज ट्रेडिशनल पोशाखात दिसले.
या सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. कलाकारांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती छोटा नवाब असलेल्या तैमूरची. या सोहळ्यातील कलाकारांची उपस्थिती ही देखील चर्चेचा विषय होती. एका बाजूला बिग बी उपस्थित होते तर त्यांची सून म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन मात्र गैरहजर राहिली. त्यामुळे हा सोहळा कलाकारांच्या उपस्थितीने देखील चर्चेत राहिला.
]