मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टाक रजनीकांत (Rajinikanth) आणि त्यांचं कुटूंब हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता रजनीकांत त्यांच्या घरी येणाऱ्या एका नव्या पाहुण्याच्या आगमनाच्या बातमीमुळे चर्चेत आहेत. रजनीकांत यांची धाकटी लेक सौंदर्यानं ( Soundarya Rajinikanth) रविवारी मुलाला जन्म दिला आहे. सौंदर्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे.
सौंदर्यानं ट्विटरवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सौंदर्यानं काही फोटो शेअर केले आहेत. यातले काही फोटो हे मॅटर्निटी फोटोशूट मधले आहेत. तर एक फोटो हा बाळानं सौंदर्याचं बोट पकडल्याचा आहे. हे फोटो शेअर करत देवाच्या अपार कृपेने आणि आमच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने, विशगन, वेद आणि मी आज 11/9/22 रोजी वेदचा धाकटा भाऊ वीर रजनीकांत वनंगामुडी यांचे स्वागत करत आहोत, असे कॅप्शन सौंदर्यानं दिलं आहे.
With gods abundant grace and our parents blessings Vishagan,Ved and I are thrilled to welcome Ved’s little brother VEER RAJINIKANTH VANANGAMUDI today #Veer #Blessed thank you to our amazing doctors @sumana_manohar Dr.Srividya Seshadri @SeshadriSuresh3 pic.twitter.com/a8tXbqmTxf
— soundarya rajnikanth (@soundaryaarajni) September 11, 2022
लग्नाच्या तीन वर्षानंतर सौंदर्या आई झाली आहे. 2019 मध्ये सौंदर्यानं विशगन वनंगामुडीसोबत दुसरे लग्न केले. तिचं पहिलं लग्न 2010 मध्ये अश्विन रामकुमारसोबत झालं होतं. मात्र, जवळपास 7 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. सौंदर्या आणि अश्विनचा एक मुलगा असून त्याचे नाव वेद आहे. त्यानंतर सौंदर्यानं 2019 मध्ये दुसरं लग्न केलं आणि आता ती विशगनच्या मुलाची आई झाली आहे.
सौंदर्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. ती एक ग्राफिक डिझायनर, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. ती तामिळ चित्रपटसृष्टीत काम करते. सौंदर्यानं वडील रजनीकांत यांचा कोचादैयान (Kochadaiyaan ) हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. दिग्दर्शक म्हणून तिचा हा पहिलाच चित्रपट होता. सौंदर्यानं 2017 मध्ये धनुषचा 'वेलैइल्ला पट्टाधारी 2' हा चित्रपट देखील दिग्दर्शित केला होता. याआधी तिनं पदयप्पा (1999), बाबा (2002), चंद्रमुखी (2005), शिवकाशी (2005), माजा (2005), चेन्नई 600028 (2007) या चित्रपटांसाठी ग्राफिक डिझायनर म्हणून काम केले.