तब्बूची साडी प्रेस, काजोलचा मेकअप करणारा आज आहे मोठा दिग्दर्शक

असं म्हणतात ना की कधी कोणाचं नशीब कसं बदलेल सांगता येत नाही. असंच काही बॉलिवूडच्या एका दिग्दर्शकासोबत झालंय.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 11, 2018, 03:07 PM IST
तब्बूची साडी प्रेस, काजोलचा मेकअप करणारा आज आहे मोठा दिग्दर्शक title=

मुंबई : असं म्हणतात ना की कधी कोणाचं नशीब कसं बदलेल सांगता येत नाही. असंच काही बॉलिवूडच्या एका दिग्दर्शकासोबत झालंय.

कोण आहे तो दिग्दर्शक

बॉलिवूडमध्ये हिट अॅक्शन सिनेमा बनवणारा रोहित शेट्टी याच्या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज इंड्स्ट्रीमध्ये यशस्वी डायरेक्टर्सच्या लिस्टमध्ये त्याचं नाव येतं. मोठे मोठे य़शस्वी सिनेमे रोहित शेट्टीने बनवले. पण हा प्रवास इतका सोपा नक्कीच नव्हता. रोहित शेट्टी एकेकाळी स्पॉटबॉय होता. त्याने अभिनेत्री तब्बूच्या साड्या देखील प्रेस केल्या आहेत.

शोमध्ये केला हा खुलासा

रोहितने याचा खुलासा इंडियाज नेक्स्ट सुपरस्टारमध्ये केला. तो या शोमध्ये जज आहे. रोहितने म्हटलं की, जेव्हा तो 'हकीकत' सिनेमाच्या सेटवर स्पॉट बॉय होता. तेव्हा त्याने तब्बूच्या साड्या देखील प्रेम केल्या. रोहितने म्हटलं की, त्याने काजोलचा मेकअप देखील केला आहे. तिचे केस देखील विंचरले आहेत. पण कधी काजोल आणि तब्बूसाठी स्पॉटबॉय आणि मेकअपमॅन असणारा रोहित याने दोन्ही अभिनेत्रींना आपल्या सिनेमामध्ये घेतलं आणि त्यांच्यासोबत काम देखील केलं आहे.

लवकरच नवा सिनेमा

रोहितने तब्बू आणि अजय देवगनसोबत सुपहिट 'गोलमाल अगेन' सिनेमा केला. त्यानंतर काजोलला दिलावाले सिनेमामध्ये घेतलं. ज्यामध्ये शाहरुख खान लीड रोलमध्ये होता. रोहित लवकरच आता सिम्बा सिनेमा घेऊन येत आहेय. ज्यामध्ये रणवीर सिंग लीड रोलमध्ये असणार आहे.