श्रीलंकन गायिका Yohani चे ब्लॉकबस्टर गाणे ‘Manike Mage Hithe’ आता हिंदीमध्ये, 'या' मोठ्या चित्रपटाचा असणार भाग

यूट्यूबवर खळबळ उडाल्यानंतर हे गाणे इन्स्टाग्रामवरही दिसू लागले.

Updated: Oct 19, 2021, 02:22 PM IST
श्रीलंकन गायिका Yohani चे ब्लॉकबस्टर गाणे ‘Manike Mage Hithe’ आता हिंदीमध्ये, 'या' मोठ्या चित्रपटाचा असणार भाग title=

मुंबई : इंटरनेटचे जग असे आहे की कधी कोणाचे नशीब रोतोरात बदलून जाईल याची कोणी कल्पना देखील करु शकणार नाही. तसेच काही सोशल मीडियावरती लोकं प्रसिद्ध होण्याची काही वाटेल ते करतात, परंतु सगळ्यांचच नशीब त्यांना साथ देत नाही. असे बरेच लोकं आपण पाहिले आहे जे खूप कमी वेळेत आपल्या वेगळ्या शैलीमुळे इंटरनेट विश्वात प्रसिद्ध झाले आहेत. श्रीलंकन गायक योहानीच्या बाबतीतही असेच घडले. ती तिच्य़ा एका गाण्यामुळे एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन  बनली.

योहानीने ‘मानिके मगे हिते’ (Manike Mage Hithe) हे गाणं गायलं आहे. जे अचानक यूट्यूबवर ट्रेंड होऊ लागले. या गाण्याचे संगीत आणि बीट याने सर्वांनाच भुरळ पाडली होते. ज्याने ज्याने हे गाणे ऐकले त्यांनी स्वतःला हे शेअर करण्यापासून रोखू शकले नाही.

यूट्यूबवर खळबळ उडाल्यानंतर हे गाणे इन्स्टाग्रामवरही दिसू लागले. बड्या सेलिब्रिटींनी या गाण्यावर रील बनवण्यास देखील सुरुवात केली आणि खूप कमी वेळात हे या वर्षातील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले गेले.

सध्या अशी बातमी समोर येत आहे की, हे योहानीचे गाणे हिंदीत पुन्हा तयार केले जाईल. योहानी स्वतः हे गाणं हिंदीत गाणार आहे. बॉलिवूडच्या जगातला हा तिचा पहिला प्रकल्प असणार आहे. जे योहानीसाठी खूप मोठी गोष्ट आहे.

योहानीचे हे हिंदीतील गाणे इंद्र कुमार दिग्दर्शित चित्रपट 'थँक गॉड' साठी रेकॉर्ड केले जाईल. हे गाणं या चित्रपटाचा एक भाग असेल. या चित्रपटात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्याला तनिष्क बागची संगीत देणार आहे.

योहानीला श्रीलंकेची रॅप राजकुमारी म्हटले जाते

श्रीलंकेची इंटरनेट सेंसेशन Yohani Diloka De Silva तिच्या हिट गाणे Manike Mage Hite साठी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रेंड झाली होती. रिलीज झाल्यापासून या गाण्याला भारतात यूट्यूबवर 160 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे हिंदी, तामिळ, मल्याळम, बंगाली आणि इतर भाषांमध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी पुन्हा तयार केले आहे.

योहानी श्रीलंकेच्या कोलंबोची रहिवासी आहे. ती एक गायक, गीतकार, रॅपर आणि संगीत निर्माता आहे. ती टिकटॉकवरील प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील आहे. तिला श्रीलंकेची 'रॅप प्रिन्सेस' म्हणूनही ओळखले जाते. ती आधीच तिच्या देशात लोकप्रिय आहे पण यूट्यूबवर खळबळ उडाल्यानंतर आता संपूर्ण जगाने तिला ओळखायला सुरुवात केली आहे.