मुंबई : बॉलिवूड अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर बरेच गौप्यस्फोट करत आणि बी टाऊनमधील प्रस्थापितांना निशाण्यावर घेत अभिनेत्री kangana ranaut कंगना राणौत हिनं सर्वांचं लक्ष वेधलं. मुंबई पोलीस, मुंबई आणि शिवसेनेबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी ही अभिनेत्री सध्या राजकीय वर्तुळांतही चर्चेचा विषय ठरते. अशा या अभिनेत्रीच्या समर्थनार्थ एका चाहत्यानं हटके अंदाजात तिची झलक असणारी साडी तयार केली आहे.
मुळच्या सूरत येथे राहणाऱ्या कापड व्यावसायिक रजत दावेर यांनी ही किमया केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 'क्वीन' कंगनाची झलक असणारी साडी साकारली आहे. या साडीवर कंगना व्यतिरिक्त गणपतीचंही चित्र आहे. 'मणिकर्णिका' या चित्रपटातील तिचा लूक या साडीवर प्रथमदर्शनी पाहायला मिळतो. कंगनाच्या समर्थनार्थ साडी साकारण्यात आल्याची प्रतिक्रिया रजत यांनी साडीबाबत माहिती देताना दिली.
'ती कोणा एका गोष्टीचं समर्थन करण्यासाठी म्हणून आपलं मत मांडत होती. पण तिचा आवाज दाबण्यात आला, तिचं कार्यालय तोडण्यात आलं. त्यामुळं आता आम्ही तिचं (कंगनाचं) समर्थन करण्याचा निर्णय़ घेतला आहे', असं ते म्हणाले.
Gujarat: A Surat-based textile businessman has manufactured a saree based on #KanganaRanaut, expressing support to the actor. He says, "She wanted to raise her voice to support something but her voice was suppressed and her office was demolished. So we wanted to support her." pic.twitter.com/Mq4uOdCqR6
— ANI (@ANI) September 13, 2020
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कंगनाला ज्या प्रकारे वागणूक मिळाली, ते पाहता रजत यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ही साडी बाजारात येताच लगेचच तिची खरेदी करण्यासाठी अनेकांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला. रजत यांनी दिलेल्या माहितीनुसार १००० रुपयांपासून या साडीची किंमत सुरु होते.