मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान कायम तिच्या सावळ्या रंगावरून चर्चेचा विषय ठरते. तर दुसरीकडे सिलेब्रिटी म्हटलं की त्यांच्या खांद्यावर एक जबाबदारीच असते. हिच जबाबदारी पार पाडत त्यांना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंचा देखील सामना करावा लागतो. सिलेब्रिटी किड्सने सोशल मीडियावर एखादा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर वर्णभेद आणि व्यक्तीच्या एकंदर शरीरयष्टीवरून अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट कमेंट येत असतात. सध्या सुहानाने सावळ्यावरून ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
एका ट्रोलरला 'काळा' आणि 'काळी' रंगाचा फरक सांगताना ती म्हणाली, 'जे लोक हिंदी बोलत नाहीत त्या लोकांना मला सांगायचं आहे की, हिंदीमध्ये काळ्या रंगासाठी 'काला' हा शब्द वापरला जातो. तर एखाद्या महिलेला काळं म्हणायचं असेल तर 'काली' या शब्दाचा वापर केला जातो. जी रंगाने सावळी असते.'
त्याचप्रमाणे सध्या अनेक मुद्दे समोर येत आहेत. त्यापैकी वर्णभेद देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्याला आपल्याला योग्य न्याय देण्याची गरज आहे. हे फक्त माझ्याबद्दलच नाही, प्रत्येक तरुण मुली / मुलाबद्दल आहे जे कोणत्याही कारणाशिवाय निकृष्टपणाच्या वातावरणात वाढले आहे. वयाच्या १२ व्या वर्षापासून लोक मला माझ्या सावळ्या रंगावरून ट्रोल करतात असं वक्तव्य सुहानाने केलं.
वर्णभेदावरून एखाद्याला गृहीत धरण्यास काही तथ्य नाही. आपण भारतीय आहोत आणि भारतीयांचा रंगा हा नैसर्गिकरित्या सावळा असतो. त्यामुळे आपल्या स्वत: च्या लोकांचा द्वेष करणे म्हणजे स्वतःलाच असुरक्षित भासवणं असं चोख प्रत्युत्तर सुहानाने नेटकऱ्यांना देत वर्णभेद संपवण्याचं आवाहन करत #endcolourism या हॅशटॅगचा वापर केला.