सनी लिओनीचा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा सोशल मीडियावर दबदबा आहे.

Updated: Jul 21, 2022, 03:55 PM IST
सनी लिओनीचा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचा सोशल मीडियावर दबदबा आहे. ती रोज काहीना काहीतरी शेअर करत असते. जे त्याच्या चाहत्यांना खूप आवडतं. सनी चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अपडेट करत असते. सनी फिटनेसची विशेष काळजी घेते. ती दररोज वर्कआउटचे व्हिडिओ शेअर करत असते. सनीच्या प्रत्येक चाहत्याला माहित आहे की, सनीला खाण्याची किती आवड आहे. सनीने व्हिडीओ शेअर करून फिटनेससोबत जेवणाचा समतोल कसा साधावा हे सांगितलं आहे. सनीने जिम फूडी चॅलेंज स्विकारलं आहे.

सनीने व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती वर्काआऊट करताना फ्राईस खाताना दिसत आहे. सनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सनीने जिम फूड चॅलेंज स्विकारलं
व्हिडिओ शेअर करताना सनीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''द जिम फूडी चॅलेंज. मी किती फ्राईज खाल्ले''? व्हिडिओमध्ये सनी टेबलवर वर्काऊट करत आहे, याचबरोबर तिचा मित्र तिला फ्राईज भरवतानाही दिसत आहेत. सनीच्या या व्हिडिओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

चाहत्यांच्या मजेदार कमेंट्स 
सनीच्या या पोस्टवर त्याचे चाहते मजेशीर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिलं आहे की, 'हाहाहाहा खूप मस्त आहे.' तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहीलं,  माझी क्वीन. अनेक चाहते तिच्या या पोस्टवर फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सनीला चित्रपटांची ओढ आहे. ती लवकरच पट्टा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर राधाकृष्णन यांनी केलं आहे.