CAA मुद्द्यावर रजनीकांत काय म्हणाले ऐकलं का?

कायमच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपलं मत मांडणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांनी पुन्हा एकदा माध्यमांचं लक्ष वेधलं आहे. 

Updated: Feb 6, 2020, 07:02 PM IST
CAA मुद्द्यावर रजनीकांत काय म्हणाले ऐकलं का?  title=
रजनीकांत

मुंबई: कायमच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपलं मत मांडणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांनी पुन्हा एकदा माध्यमांचं लक्ष वेधलं आहे. देशातील मुस्लिमांना याविषयी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात CAA हा आपल्या देशातील नागरिकांवर कोणत्याही प्रकारे प्रभाव पाडत नाही. मुळात मुस्लिमांवर याचे काही परिणाम होणार असतील, तर त्यांच्यासोबत उभा असणारा मी पहिला व्यक्ती असेन. 

एनपीआर हा देशासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याचं म्हणत त्यामुळे देशाबाहेरील नागरिक कोण आहेत, याची माहिती मिळेल असं ते म्हणाले. शिवाय अद्यापही एनआरसी लागू झालेला नाही, असंही ते म्हणाले. 

काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांनी सीएएच्या मुद्द्यावरुन होणाऱा विरोध पाहता यावर दु:ख व्यक्त केलं होतं. ट्विट करत त्यांनी या सर्व प्रकरणी निराशा व्यक्त केली होती. हिंसेच्या मार्गाने कोणत्याही समस्येवर तोडगा निघत नाही. मी भारतीयांना कायम एकत्र राहण्याचाच संदेश देत आलो आहे. कायम देशाची सुरक्षितता आणि देशहिताचा विचार करा. असं त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं. 

सरकारच्या बऱ्याच योजना आणि उपक्रमांचं समर्थन करत रजनीकांत यांनी कायम त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कला क्षेत्राकडून राजकारणाकडे वळलेल्या या अभिनेत्याची एकंदर भूमिका पाहता येत्या काळात ते या राजकारणात पूर्णत: केव्हा सक्रिय होतात याकडेच साऱ्यांचं लक्ष असेल.