मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिका गेल्या 13 वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. ही मालिका टप्पू सेनेमुळे लहान मुलांना तर गोकूळधाम सोसायटीमधील एकीमुळे प्रेक्षकांना आवडते. मालिकेतील सर्वांत आवडती भूमिका म्हणजे 'दयाबेन'. मालिकेत 'दयाबेन'ची भूमिका अभिनेत्री दिशा वकानी उत्तम रित्या पार पाडली. पण गेल्या काही वर्षांपासून दिशा मालिकेपासून दूर आहेत.
दिशा लवकरचं मालिकेत पुन्हा पदार्पण करेल, अशी अपेक्षा असताना दिशा पुन्हा प्रेग्नेंट असल्याचं समोर येत आहे. सध्या दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दिशा प्रेग्नेंट असल्याचं दिसून येत आहे. पण आता व्हायरल होत असलेले फोटो लेटेस्ट आहेत की जुने फोटो आहेत, हे कळू शकलेलं नाही.
फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर दिशावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही युजर दिशाला डिलीव्हारी डेट विचारत आहेत, तर काही युजर दिशाला काळजी घेण्यासाठी सांगत आहे. पण दिशाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
सांगायचं झालं तर 'दया बेन' मालिकेत 2017 पासून दिसत नाही. दिशा वकानीच्या जागी निर्मात्यांनी अद्याप कोणी स्थान दिलेलं नाही. 2017 मध्ये तिने एका मुलीला जन्म दिला. दरम्यान, अनेकवेळा त्याचे स्वतःच्या मुलीसोबतचे फोटो समोर आले आहेत.