मुंबई : अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय.
तेजस्विनीनं इन्स्टाग्रामवर नवरात्री निमित्तानं एक फोटोशूट केलंय... या फोटोंत तिच्या हाताला सलाईनची सुई लावलेली दिसतेय... अनेकांना ही सुई कदाचित तिच्या कॉस्च्युम्स आणि मेकअपचा एक भाग वाटेल... परंतु खरोखरच तेजस्विनीची तब्येत खालावलेली असतानादेखील तिनं स्वत:ला कामात गुंतवून ठेवलंय... हे पाहायला मिळालं 'ये रे ये रे पैसा'च्या सेटवर!
संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा'च्या सेटवरचा तेजस्विनी अंगावर अगदी चादर लपेटून बसलेली फोटोंतून दिसतेय. चित्रपटाचं शूटिंग बऱ्यापैकी पार पडलंय. त्यातलं तेजस्विनीच्या भूमिकेचं चित्रीकरण सध्या सुरु आहे. परंतु त्याच दरम्यान तेजस्विनी आजारी पडली... तिला १०४ डिग्री ताप होता आणि त्यामुळे तिला दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं होतं. परंतु केवळ दोन दिवस आराम करून तेजस्विनी पुन्हा एकदा शुटिंगवर रुजू झाली.
शुटिंगच्या दरम्यान तेजस्विनीची तब्येत तशी फारशी ठिक नाही. तरीदेखील तेजस्विनीने शूटिंग सुरु ठेवलं... शूटिंगच्या ठिकाणी मध्ये-मध्ये ब्रेक घेऊन औषधे घेणे, सलाईन लावणे असे उपचार करून ती तब्येत जपायचा प्रयत्न करतेय.