सायली कौलगेकर, येवला : दार उघड बये दार उघड, म्हणत आदेश बांदेकर गेली १८ वर्षं होम मिनिस्टर्सचा पैठणी देऊन सन्मान करतायत... घरोघरी आनंदाची उधळण करणारा हा झी मराठीचा लोकप्रिय कार्यक्रम.... आता या कार्यक्रमातलं नवं पर्व 'महामिनिस्टर'मध्ये मिळणार आहे तब्बल ११ लाखांची पैठणी....
ही अकरा लाखांची पैठणी कुठे तयार होतेय, ती कशी दिसते... हे सर्व शोधण्यासाठी आमचा हा खास रिपोर्ट थेट येवल्यातून....आणि आता तुम्ही पाहणार आहात ही अकरा लाखांची पैठणी फक्त आमच्या माध्यमातून.......
हीच ती सोन्याची जर असलेली ११ लाखांची पैठणी....येवल्यातल्या कापसे पैठणीमध्ये ही अकरा लाखांची पैठणी विणण्याचं काम सुरू आहे...
महत्त्वाचं म्हणजे ही पैठणी तयार करणारे दोन्ही कारागिर दिव्यांग आहेत... त्यांनी तयार केलेल्या या पैठणीला महामिनिस्टरमध्ये झळकण्याचा मान मिळणार आहे. पैठणी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय... त्यात ती पैठणी होम मिनिस्टरमध्ये मिळाली तर आणखीनच भारी... आता ही सोन्यानं मढलेली ११ लाखांची पैठणी विणून तयार होतेय... आता उत्सुकता आहे ती ही अकरा लाखांची पैठणी कुणाला मिळणार... आणि कोण ठरणार महामिनिस्टर याची...