Shoaib Ibrahim Dipika Kakar : छोट्या पडद्यावरील अभिनेता शोएब इब्राहिम आणि त्याची पत्नी दीपिका कक्कड हे नेहमीच चर्चेत असतात. त्यांचे व्लॉग्स हे चांगलेच चर्चेत राहतात. या व्लॉगमध्ये ते त्यांचं आयुष्य आणि काय काय करतात ते दाखवताना दिसतात. तर नुकताच त्यांनी एक व्लॉग शेअर केला असून त्यात त्यांनी चाहत्यांना किंवा त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तर दिली आहेत. त्यावेळी अनेकांनी म्हटलं की दीपिकानं आधीच्या लग्नातून झालेल्या मुलीला सोडलं होतं. अशा अनेक रिपोर्ट आल्या आहेत ज्यात दावा करण्यात आला आहे की तिनं कधीच तिच्या पहिला बाळाविषयी काही चर्चा केली नाही. मात्र, दोघांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आणि दीपिकाची कोणतीही मुलगी नाही असं सांगितलं.
दरम्यान, सततच्या चाहत्यांच्या प्रश्नांमध्ये शोएब इब्राहिमनं एका अशा प्रश्नाचा उल्लेख केला जो त्यांना गेल्या अनेक वर्षांपासून सतवत आहे. त्यांनी सांगितलं की कधी-कधी यामुळे खूप चिडचिड होते. कोणी असं कसं सांगू शकतं? त्यानंतर त्यांनी एका चाहत्यानं विचारलेला प्रश्न वाचला, त्यात म्हटलं होतं की दीपिकाला पहिल्या लग्नातून एक मुलगी आहे. तर त्यावर तुम्ही उत्तर का देत नाही आहात?
शोएबनं सांगितलं की कशा प्रकारे सोशल मीडियावर कोणीही कोणाविरोधातही कसे ही आरोप लावू शकतात आणि ही आशा करण्यात येते की आरोप करण्याचं कारण काय आहे. त्यावर शोएब खुलासा करत म्हणाला की 'मी आज स्पष्टपणे सांगतोय की ही बातमी खोटी आहे. ज्या कोणत्या व्यक्तीनं ही खोटी बातमी पसरवली आहे त्याला नेमकं काय हवंय हे माहित नाही.'
शोएबनं सांगितलं की कोणीतरी हा आरोप आणि ही खोटी बातमी तेव्हा सुरु केली जेव्हा दीपिका प्रेग्नंट होती. त्यानं सांगितलं की 'त्यावेळी दीपिकाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता. त्यामुळे अनेक गोष्टी या समोर आल्या होत्या.' दीपिकानं पुढे खुलासा केला की 'जेव्हा मी प्रेग्नंट होती, जेव्हा मी रुहानला जन्म दिला आणि जेव्हा मी त्याचा सांभाळ करायला लागली, तेव्हा मला खूप काही सहन करावं लागलं. अनेक लोकं काय काय बोलत होते. मला सतत चिंता असायची. शोएबनं मला त्यावेळी शांत केलं.'
पुढे दीपिका म्हणाली, 'हे खूप वाईट आणि चुकीचं आहे. जिचा गर्भपात झाला आणि आता जी महिला तिच्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर खूप आनंदी आहे, त्या महिलेवर तुम्ही इतका मोठा आरोप करु शकत नाही. ती आता तिच्या पहिल्या बाळासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.'
दीपिकानं खुलासा केला की कशा प्रकारे ट्रोलर्स प्रत्येकवेळी तिला टोमने मारायचे आणि हा दावा करायचे की तिची पहिली मुलगी आहे. इतकंच नाही तर दीपिकानं पुढे सांगितलं की कशा प्रकारे 'ससुराल सिमर का' मधील बालकलाकारासोबतचे तिचे फोटो कसे व्हायरल केले होते. त्या मुलांना पाहूनच सांगत होते की तिच्या पहिल्या लग्नातून ती झाली आहे.
हेही वाचा : 'माझ्याकडे प्रायव्हेट जेट नाही, ना गुंतवणूक करण्यासाठी पैसे...'; अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा
पत्नीवर होत असणाऱ्या या सगळ्या अफवांवर शोएबला किती राग येतो याविषयी पुढे तो म्हणाला, 'ट्रोलर्सनं त्यांचे व्ह्यूज वाढवण्यासाठी असं केलं आहे. त्याशिवाय यापुढे कोणत्याही अफवांवर ते प्रतिक्रिया देणार नाही.'