Nysa Devgn मित्रांसोबत पार्टी करण्यात दंग; फोटो पाहून बसेल धक्का

काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगनची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे

Updated: Apr 5, 2022, 05:29 PM IST
Nysa Devgn मित्रांसोबत पार्टी करण्यात दंग; फोटो पाहून बसेल धक्का title=

मुंबई : काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासा देवगनची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. न्यासाचे नवीन फोटो येताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. काजोल आणि अजयची मुलगी असल्याने लोकं न्यासाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. न्यासाचा एक ताजा फोटो इंटरनेटवर समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिच्या मित्रांसोबत दिसत आहे. या फोटोमध्ये न्यासा खूपच ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर लोकं पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश लूकचं कौतुक करत आहेत.

हा सुंदर फोटो न्यासा देवगनच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये न्यासा अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये, तुम्ही उजव्या बाजूला सॅटिन शॉर्ट क्रीम कलरचा ड्रेस घातलेला न्यासाला पाहू शकता. या फोटोत न्यासाचे सगळे फ्रेंड्स तिच्या बाजूला उभे दिसत आहेत आणि कॅमेऱ्याकडे बघून पोझ देत आहेत. न्यासा तिच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. न्यासाच्या या फोटोवर सोशल मीडिया यूजर्स आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटोवर कमेंट करत एका सोशल मीडिया यूजरने लिहिलं की, "Gorgeous Nyasa", तर दुसऱ्याने लिहिलं, "Summer Girl". नुकतंच न्यासा देवगनने बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी रॅम्प वॉक केला.यादरम्यान ती अतिशय स्टायलिश आउटफिटमध्ये दिसली होती. ज्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.