मुंबई : फिल्म इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या फिटनेससाठी ओळखलं जातं. मलायका अरोरा ते शिल्पा शेट्टीपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या स्लिम फिगरसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या फिटनेसचं रहस्य जाणून घेण्यासाठी बऱ्याचदा लोकं त्यांचं इंस्टाग्राम पेज तपासत असतात,
जर तुम्हालाही तुमच्या आवडत्या अभिनेत्रीसारखी फिट राहयचं असेल, पण लाखो प्रयत्न करूनही तुम्हाला डिटॉक्स ड्रिंक सापडत नाही, तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशाच 5 अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, जे कोणते डिटॉक्स ड्रिंक घेतात. तुमच्याही कंबरेचे फॅट्स तुम्ही स्वतः सहज कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रींचं फिटडिटॉक्स ड्रिंक कोणते आहेत याबद्दल सांगणार आहोत.
शिल्पा शेट्टी
इन्स्टाग्रामवर लाखो लोकांना फिटनेसचे सल्ले देणारी शिल्पा शेट्टी खऱ्या आयुष्यातही फिटनेस फ्रीक आहे. शिल्पा जिम, योगा करताना दिसत असते. पण शिल्पाला तिचं शरीर डिटॉक्स करण्यासाठी जिरं, ओवा आणि बडीशेपपासून बनवलेलं पेय प्यायला आवडतं. हे पेय तुमचे आतडे निरोगी ठेवतं आणि पोट फुगण्याची समस्या कमी करतं. वजन कमी करण्यासोबतच हे पेय चयापचय देखील वाढवतं.
शहनाज गिल
शहनाज गिलचं डिटॉक्स पेय म्हणजे हळदीचं पाणी. हळदीमध्ये असलेले क्युरक्यूमिन हे अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असतं तसंच त्यामध्ये असणारे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म तुमचं पचन सुधारण्यासोबतच वजन कमी करण्यासही मदत करतात.
रकुल प्रीत सिंह
रकुलचं वजन कमी करणारं हे पेय तुमच्या भुवया उंचावतील. खरंतर या पेयामध्ये कॉफी आणि तूप असतं. याला बुलेटप्रूफ कॉफी असेही म्हणतात, जी अनेकदा वर्कआउट करण्यापूर्वी प्यायली जाते. हे ड्रिंक प्यायल्याने हेल्थी फॅटने भरलेलं असतं. जे चयापचय वाढवतं तसंच जेवणा दरम्यान तुमची भूक भागवते.
मलाइका अरोरा
मलायका अरोरा वयाच्या ४८ व्या वर्षी सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचे आवडतं डिटॉक्स ड्रिंक मेथी आणि जिरापासून बनवलेले आहे, जे असंख्य फायद्यांचं भांडार आहे. हे तुमच्या आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं. इतकंच नाही तर ते तुमच्या शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं.
भूमि पेडणेकर
एकेकाळी भूमीचं वजन किती वाढलं होतं हे सर्वांनाच माहीत आहे पण भूमीचे वजन कमी झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. भूमीने तिच्या वजन कमी करणाऱ्या ड्रिंकबद्दल सांगितलं होतं, ज्यामध्ये लिंबू आहे. शरीर स्वच्छ ठेवण्यासोबतच लिंबू रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. त्यात पुदिना मिसळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.